शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
3
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
4
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
5
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
7
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
8
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
9
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
10
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
11
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
12
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
13
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
14
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
15
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
16
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
17
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
18
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
19
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
20
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

जळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाला निवेदन चिटकविले

By admin | Updated: August 26, 2016 16:42 IST

कांद्याला ५०० रुपये भाव मिळावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना एकही अधिकारी न भेटल्याच्या

ऑनलाइन लोकमत

जळगाव, दि. 26 -  कांद्याला ५०० रुपये भाव मिळावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना एकही अधिकारी न भेटल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाला निवेदन चिटकविण्यात आले. तसेच दालनाजवळ कांदे फेक आंदोलन करण्यात आले.राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष योगेश देसले, राष्ट्रवादी युवती प्रमुख कल्पिता पाटील, लिगल आघाडीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.सचिन पाटील, अ‍ॅड.कुणाल पाटील, शितल पाटील, रुपाली मराठे, ललित बागुल,पंकज वाघ यांच्यासह कार्यकर्ते शुक्रवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास कांद्याला चांगला भाव मिळावा यासाठी निवेदन देण्यात आले. राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी सुरुवातीला जिल्हाधिकारी यांच्या दालनाजवळ आले. या ठिकाणी स्वीय साहाय्यकांनी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल या कार्यालयात नसल्याने त्यांची भेट होऊ शकत नसल्याचे निवेदनकर्त्यांना सांगितले. त्यानंतर पदाधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांच्याकडे आले. मात्र मुंडके देखील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना भेटले नाही. त्यानंतर कार्यकर्ते पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाजवळ आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वीय साहाय्यकांनी उपजिल्हाधिकारी साजीद पठाण हे दालनात असून त्यांच्याकडे निवेदन देण्यास सांगितले. मात्र आंदोलनकर्त्यांनी पठाण यांना निवेदन स्विकारण्यासाठी या ठिकाणी बोलवावे असा आग्रह धरला.संतप्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाला निवेदन चिटकविले तसेच एकही अधिकारी जागेवर नसल्याच्या निषेधार्थ सोबत आणलेली कांद्यांची गोणी दालनाजवळ रिकामी केली.