शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’ याचिका फेटाळली

By admin | Updated: June 11, 2016 03:56 IST

शनी शिंगणापूर मंदिराच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश देण्यासंबंधी उच्च न्यायालयाने दिलेला आदेश मागे घ्यावा, अशी मागणी करणारी ठाण्याच्या एका समाजसेविकेची याचिका उच्च न्यायालयाने

मुंबई : शनी शिंगणापूर मंदिराच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश देण्यासंबंधी उच्च न्यायालयाने दिलेला आदेश मागे घ्यावा, अशी मागणी करणारी ठाण्याच्या एका समाजसेविकेची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. सुनिता पाटील यांना अशी याचिका दाखल करण्याचा अधिकार नाही, असे उच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. मात्र अशीच मागणी करणारी एक याचिका शनी शिंगणापूरच्या पुजाऱ्याने केली आहे. त्या याचिकेवरील सुनावणी अद्यापही उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.ज्या धार्मिकस्थळांंध्ये पुरुषांना प्रवेश आहे, अशा धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश करण्याचा हक्क महिलांनाही आहे. महिलांच्या या हक्काचे रक्षण करण्याचे कर्तव्य राज्य सरकारचे आहे, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने महिलांचा शनी शिंगणापूरच्या चौथऱ्यावर जाण्याचा मार्ग मोकळा केला. हा निर्णय उच्च न्यायालयाने पुण्याच्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ आणि ज्येष्ठ वकील निलिमा वर्तक यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर दिला. शनी शिंगणापूरच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश न देण्याच्या देवस्थान समितीच्या निर्णयाला बाळ व वर्तक यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र हा निर्णय ज्या कायद्याचा हवाला देत घेण्यात आला, तो कायदा मुळातच स्वातंत्र्यानंतर दलित व मागासवर्गीयांसाठी तयार करण्यात आल्याचे या आदेशाला आव्हान देणाऱ्यांनी याचिकेत म्हटले आहे. याचिकाकर्तीला ही याचिका दाखल करण्याचा अधिकार नाही, असे म्हणत मुख्य न्या. डी. वाघेला यांनी पाटील यांची याचिका फेटाळली. मात्र शनी शिंगणापूरच्या एका पुजाऱ्याने अशीच मागणी केलेली याचिका प्रलंबित ठेवली आहे. (प्रतिनिधी)कायदा दलित आणि मागासवर्गीयांसाठी- ‘महाराष्ट्र हिंदू प्लेस आॅफ वर्शिप (एन्ट्री आॅथोरायझेशन) अ‍ॅक्ट, १९५६’ हा कायदा स्वातंत्र्यानंतर दलित व मागासवर्गीयांना धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश मिळावा, यासाठी करण्यात आला. त्यांच्याबाबत भेदभाव केला जाऊ नये, हे या कायद्यामागचे उद्दिष्ट होते. - लिंगभेद निवारण हा या कायद्यामागचा हेतू नाही. जर तसे असेल तर सरकारने या कायद्यात सुधारणा करून ‘महिला’ हा शब्द घालावा,’ अशी मागणी सुनिता पाटील यांनी याचिकेद्वारे केली होती.