शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांच्या आर्थिक लूटप्रकरणी याचिका

By admin | Updated: May 10, 2014 19:11 IST

धुळे : शेतीपंपासाठी नवीन वीज जोडणी मागणार्‍या शेतकर्‍यांना तातडीने जोडणी (कनेक्शन) हवी असेल तर विद्युत खांब, वाहिनीसह जोडणीचा सर्व खर्च स्वत: करावा लागेल,

 

धुळे : शेतीपंपासाठी नवीन वीज जोडणी मागणार्‍या शेतकर्‍यांना तातडीने जोडणी (कनेक्शन) हवी असेल तर विद्युत खांब, वाहिनीसह जोडणीचा सर्व खर्च स्वत: करावा लागेल, हा महावितरण कंपनीने काढलेला फतवा रद्द करण्यासाठी महाराष्टÑ वीज ग्राहक संघटनेने महाराष्टÑ विद्युत नियामक आयोगाकडे याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी आयोगाच्या आदेशाचा भंग केल्याबद्दल कंपनी व सर्व संबंधित अधिकार्‍यांविरुद्ध शिक्षेची कठोर कारवाई करून हा फतवाही रद्द करावा, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. या संदर्भात संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे व प्रा.श्याम पाटील यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, महावितरण कंपनी पूर्वी आॅऊट राईट कॉन्ट्रिब्युशन (ओआरसी) नावाने अशी वसुली करीत होती. परंतु नवीन वीज कायदा आल्यानंतर आयोगाने सप्टेंबर ०६ मध्ये आकारांची अनुसूची जाहीर केली व अशी वसुली करता येणार नाही, हे स्पष्ट केले. तरीही अशी बेकायदा वसुली सुरूच राहिल्याने संघटनेने आयोगासमोर याचिका दाखल केली. त्या वेळी आयोगाने कंपनीस दोन लाख रुपये दंड ठोठावला होता. तसेच बेकायदेशीररीत्या घेतलेल्या रकमाही परत करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कंपनीने दोन परिपत्रके जाहीर करून अशी वसुली थांबविली. त्यामुळे शेतकर्‍यांनी खांब, वाहिनी आदी खर्च केला तरी त्या रकमांचा परतावा मिळू लागला. त्यामुळे शेतकर्‍यांना तातडीने वीज जोडणी घेणे शक्य झाले. त्यानंतर २००८ पासून गेल्या सहा वर्षात कायदा, विनिमय व आदेश यात कोणताही बदल झालेला नसताना सरकारी मुजोर प्रवृत्तीच्या कंपनी अधिकार्‍यांनी चालू वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात हा बेकायदा फतवा काढला. त्यानुसार शेतकर्‍यांस विनाखर्च जोडणी हवी असेल तर ती शासकीय योजनांमधून चार/पाच वर्षांनी केव्हाही उपलब्धतेनुसार मिळेल. खर्च परतावा (नॉन डीडीएफ) योजनेंतर्गत जोडणी मिळणार नाही, असे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे राज्यातील नवीन वीज जोडणी घेणार्‍या शेतकर्‍यांची तसेच जोडणी अर्ज प्रलंबित असलेल्या अंदाजे एक लाख ग्राहकांची बेकायदेशीर आर्थिक लूट होणार आहे.