शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सुरेशदादा जैन यांची जामिनासाठी याचिका

By admin | Updated: October 2, 2014 01:32 IST

धुळे कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेले आ. सुरेशदादा जैन हे विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी 15 दिवसांच्या तात्पुरत्या जामिनासाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

औरंगाबाद : जळगाव येथील घरकुल घोटाळाप्रकरणी धुळे कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेले आ. सुरेशदादा जैन हे विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी 15 दिवसांच्या तात्पुरत्या जामिनासाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. याशिवाय यापूर्वीच्या अन्य दोन याचिका खंडपीठात दाखल आहेत. या तिन्ही याचिका एकत्रित सुनावणीसाठी बुधवारी न्या. संभाजी शिंदे आणि न्या. टी. व्ही. नलावडे यांच्यासमोर आल्या असता न्यायालयाने पुढील सुनावणी 8 ऑक्टोबर रोजी ठेवली.
जळगाव महानगरपालिकेने बेघरांसाठी घरकुल योजना आणली होती. या योजनेत भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी तत्कालीन मनपा आयुक्त प्रवीण गेडाम यांनी दिलेल्या तक्रारीवरून आ. सुरेशदादा जैन यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याप्रकरणी जैन हे सध्या धुळे येथील कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. तसेच हा खटला धुळे येथील विशेष न्यायालयात सुरू आहे.
या वेळी जैन यांच्या वतीने  युक्तिवाद करताना माजी केंद्रीय मंत्री तथा ज्येष्ठ विधिज्ञ सलमान खुर्शिद  म्हणाले की, गुन्ह्याच्या वेळी जैन हे महाराष्ट्रात गृहनिर्माणमंत्री होते. शासनाच्या परवानगीशिवाय त्यांच्या विरोधात खटला चालविता येणार नाही. घटनेनुसार जैन यांच्या मूलभूत अधिकाराचे संरक्षण होणो आवश्यक आहे. तसेच त्यांच्यावरील आरोपाची शहानिशा ही खटला सुरू झाल्यानंतरच होणार आहे. त्यामुळे तोर्पयत त्यांना जामीन देता येऊ शकतो. शिवाय ते सध्या विधानसभा निवडणुकीचे उमेदवार असल्याने 15 दिवसांचा तात्पुरता जामीन देण्याबाबत सहानुभूतीने विचार करावा. अॅड. खुर्शिद यांचा तासभर युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने या याचिकांवरील सुनावणी 8 ऑक्टोबर्पयत पुढे ढकलली.
 
च्जैन जळगाव मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवीत आहेत. या निवडणुकीसाठी 15 दिवसांचा तात्पुरता जामीन मिळावा, यासाठी त्यांनी औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल केला. तसेच यापूर्वी त्यांनी नियमित जामीन मिळावा, यासाठी 2क्13 मध्ये क्रिमिनल अर्ज क्रमांक 613 आणि 2क्14 मध्ये 5412 दाखल केलेला आहे. या तिन्ही अर्जावर आज न्यायमूर्ती संभाजी शिंदे आणि न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे यांच्यासमोर एकत्रित सुनावणी घेण्यात आली.