मुंबई : गुजरातीविरोधी भाष्य केल्याप्रकरणी माजी मंत्री नारायण राणे व आमदार नितेश राणे यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली़राणे पिता-पुत्रांनी गुन्हा केल्याचे तपास निष्पन्न झाले नसल्याचे राज्य शासनाने न्या़ नरेश पाटील व न्या़ अजय गडकरी यांच्या खंडपीठाला सांगितले़ ते ग्राह्य धरीत न्यायालयाने ही याचिका फेटाळली़ याप्रकरणी भगवानजी दयानजी यांनी याचिका केली होती़नितेश यांनी टिष्ट्वटरवरून गुजराती समाजविरोधी भाष्य केले होते याचे नारायण राणे यांनी समर्थन केले होते़ याचा तपास स्थानिक पोलीस योग्य प्रकारे करीत नसल्याने हा तपास स्वतंत्र तपास यंत्रणेकडे सोपवावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती़ (प्रतिनिधी)
राणेंविरोधातील याचिका फेटाळली
By admin | Updated: January 29, 2015 05:47 IST