मुंबई : राधे माँ नागरिकांची फसवणूक करते, धार्मिक भावना दुखावतील असे बीभस्त वर्तन करते, त्यामुळे तिच्याविरुद्ध गुन्हा नोंदवावा, अशी मागणी करणारी फौजदारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.अॅड. फाल्गुनी ब्रह्मभट यांनी ही याचिका केली आहे. राधे माँ यांच्याविरोधात बोरीवली पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्या धार्मिक भावना दुखावतील असे वर्तन करतात व नागरिकांची फसवणूक करतात, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पण पोलीस कारवाई करीत नसल्याने उच्च न्यायालयात याचिका केल्याचे अॅड. ब्रह्मभट यांनी सांगितले. या याचिकेवर येत्या काही दिवसांत सुनावणी होईल. गेल्या आठवड्यात राधे माँविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याची तक्रार नोंदवण्यात आली. तेव्हापासून राधे माँ चर्चेत आहे. मात्र हे आरोप खोटे असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
राधे माँविरोधात याचिका
By admin | Updated: August 12, 2015 02:50 IST