शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पीटर मुखर्जीच्या कोठडीत वाढ

By admin | Updated: November 24, 2015 02:51 IST

बहुचर्चित शीना बोरा हत्याप्रकरणी सीबीआयाने अटक केलेल्या पीटर मुखर्जीच्या कोठडीत सोमवारी तीन दिवसांनी वाढ करण्यात आली आहे

मुंबई : बहुचर्चित शीना बोरा हत्याप्रकरणी सीबीआयाने अटक केलेल्या पीटर मुखर्जीच्या कोठडीत सोमवारी तीन दिवसांनी वाढ करण्यात आली आहे. शीनाच्या हत्येमागे आर्थिक व्यवहार कारणीभूत असल्याचा दावा सीबीआयने केला. भारत आणि इंग्लंडमध्ये पीटर आणि इंद्राणीची मालमत्ता आहे. मात्र या मालमत्तेबाबत दोघांकडूनही पुरेशी माहिती मिळालेली नाही. या प्रकरणी अधिक चौकशी करण्याची सीबीआयची मागणी मान्य करत न्या. महेश नातू यांनी पीटरच्या कोठडीत २६ नोव्हेंबरपर्यंत वाढ केली. सोमवारी सीबीआयतर्फे अ‍ॅडिशनल सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी केलेल्या युक्तिवादानुसार, राहुल हा पीटरचा मुलगा आहे. राहुल आणि शीनाचे प्रेमप्रकरण पीटरला माहिती होते. शीनाच्या अचानक गायब होण्यामुळे अस्वस्थ असलेल्या राहुलची तळमळ पीटरला दिसत होती. त्यामुळे कुटुंबातील जवळची व्यक्ती असलेल्या राहुलला शीनाशी माझे बोलणे झाले, ती मजेत आहे. तिची काळजी करु नको, अशी थाप मारण्याची पीटरला काय गरज होती? २२ एप्रिल २०१२ रोजी इंद्राणी आणि पीटर यूकेला गेले होते. त्यानंतर २३ तारखेला इंद्राणी मुंबईत परतली. २४ तारखेला शीनाची हत्या होते. त्यापाठोपाठ २६ तारखेला पीटर मुखर्जी मुंबईत परततात. या हत्याकांडादरम्यान पीटर आणि इंद्राणी दरम्यान तब्बल १८ ते २० मिनिटे संभाषण झाले आहे. एरवी त्यांच्या संभाषणामध्ये दोन मिनिटांपेक्षा जास्त बोलणे झाल्याचे आढळले नाही. त्यामुळे शीनाच्या हत्येबाबतच हे संभाषण झाल्याचा संशय आहे. पीटरनी भारतासह इंग्लंडमध्ये असलेल्या मालमत्तेची माहिती दिली आहे. ही मालमत्ता कोठून आली, याबाबत दोघांनीही माहिती दिलेली नाही, त्यांचे तपासात सहकार्यही कमी आहे. हा व्यवहार शीनाच्या हत्येमागे असल्याचा दावा सीबीआयकडून करण्यात आलो. त्यामुळे पीटरच्या चौकशीतून याच गूढ उकलण्यास मदत होईल, असे सिंह यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणी अधिक तपास करण्यासाठी १० दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती. यावर बचाव पक्षाचे वकील अमित देसाई यांनी सिंह यांचे आरोप फेटाळून लावले. इंद्राणी मुखर्जीच्या अटकेपासून पीटर मुखर्जी तपासास सहकार्य करत आहे. त्यात मुंबई पोलिसांकडून सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये पीटर मुखर्जींच्या विरोधात एकही लाईन नाही. शिवाय राहुलने सादर केलेले रेकॉर्डिंग मुंबई पोलिसांकडेही होते. या रेकॉर्डिंगबाबत अधिक तपास करतेवेळी स्वत: पीटर राहुलसोबत खार पोलीस ठाण्यात ये-जा करत होते. त्यात सीबीआयने केलेल्या तपासात यापलीकडे कुठलाही नवा पुरावा समोर आणलेला नाही. त्यात सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार, एखादा व्यक्ती तपासास सहकार्य करत असेल त्याला कोठडीची गरज नाही. त्यामुळे केवळ कॉल्स तपशिलाच्या आधारावर कोठडीत वाढ करणे चुकीचे आहे.