शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

पीटर मुखर्जीला दिलासा नाही

By admin | Updated: November 17, 2016 06:18 IST

शीना बोराच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप असलेल्या पीटर मुखर्जीची जामिनावर सुटका करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला.

मुंबई: शीना बोराच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप असलेल्या पीटर मुखर्जीची जामिनावर सुटका करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. न्या. एन. डब्ल्यू. सांबरे यांनी बुधवारी पीटर मुखर्जीचा जामीन अर्ज फेटाळला आहे. सीबीआयने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात पीटरला शीना बोरा हत्येप्रकरणी अटक केली. सत्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर, पीटरने उच्च न्यायालयात धाव घेतली, परंतु उच्च न्यायालयाने त्याला दिलासा देण्यास नकार दिला. मंगळवारी पीटरतर्फे आबाद पौडा यांनी उच्च न्यायालयात युक्तिवाद केला. शीना आणि राहुलच्या प्रेमसंबंधाला पीटरचा विरोध नसल्याचे अ‍ॅड. पौडा यांनी उच्च न्यायालयाला सांगितले. इंद्राणीच्या सांगण्याप्रमाणे पीटर वागला आणि त्याची तिच चूक त्याला भोवल्याचेही अ‍ॅड. आबाद पौडा यांनी सांगितले.बुधवारच्या सुनावणीत सीबीआयने पीटरच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादावर आक्षेप घेतला. ‘शीना आणि राहुलच्या प्रेमसंबंधाला पीटरचा आक्षेप होता. पैसे नसेल तर शीना तुला सोडून जाईल,’ असे पीटरने राहुलला मेलद्वारे सांगितले होते. पीटरने मित्राच्या सहाय्याने शीना आणि राहुलला वेगळे केले होते,’ असा युक्तिवाद सीबीआयतर्फे अ‍ॅडिशनल सॉलिसीटर जनरल अनिल सिंग यांनी उच्च न्यायालयात केला.शीनाची हत्या करण्यापूर्वी व हत्या केल्यानंतर इंद्राणी मोबाइलद्वारे सतत पीटरच्या संपर्कात होती, असेही अ‍ॅड. सिंग यांनी उच्च न्यायालयाला सांगितले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत, उच्च न्यायालयाने पीटरचा जामीन अर्ज फेटाळला. शीनाच्या हत्येप्रकरणात इंद्राणी मुखर्जी, संजीव खन्ना, श्यामवर राय आणि पीटर मुखर्जी हे आरोपी आहेत. (प्रतिनिधी)