शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

कीटकनाशक घातक हत्यार!

By admin | Updated: October 17, 2015 03:09 IST

पिकांवरील कीडनियंत्रणासाठी शोधली गेलेली विषारी कीटकनाशके आता हताश शेतकऱ्यांद्वारे देशभरात घातक शस्त्राच्या स्वरूपात वापरली जाऊ लागली आहेत

गणेश देशमुख, अमरावतीपिकांवरील कीडनियंत्रणासाठी शोधली गेलेली विषारी कीटकनाशके आता हताश शेतकऱ्यांद्वारे देशभरात घातक शस्त्राच्या स्वरूपात वापरली जाऊ लागली आहेत. आत्मघातासाठी सहज उपलब्ध असलेल्या या 'हत्यारा'ला मिळणारी वेगवान पसंती चिंताजनक आहे. पद्धतीतील सोपेपणा, मृत्यूची खात्री, खिशाला पेलणारे आणि सहज उपलब्धता या बाबींमुळे आत्मघात करण्यासाठी कीटकनाशकांच्या वापरात कमालीची वाढ झाली आहे. देशभरातील सर्वच प्रकारच्या आत्महत्यांच्या पद्धतींंचे विश्लेषण करून, एनसीआरबीने जारी केलेल्या एका आकडेवारीत कीटकनाशकांच्या सेवनाने झालेल्या आत्महत्यांची टक्केवारी २९ इतकी नोंदविली आहे. देशात आत्महत्येसाठी वापरल्या जाणाऱ्या १४ पद्धतींपैकी कीटकनाशक प्राशन करण्याच्या पद्धतीने थेट दुसऱ्या क्रमांकावर धडक दिली आहे. आत्महत्येसाठी गळफासाच्या पद्धतीचा सर्वाधिक प्रमाणात वापर केला असून, त्याची टक्केवारी ३६ आहे. देशातील केवळ शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणांचा विचार केल्यास, कीटकनाशकांच्या वापराची क्रमवारी पहिली आहे.या कीटकनाशकाचा अतिरेकी वापर महाराष्ट्रात सर्रास सुरू आहे. भाजीपिकांवर फवारण्यास मनाई असलेल्या या कीटकनाशकाचा वापर विदर्भ प्रांतात इतका चिंताजनकरीत्या वाढला आहे की, कृषितज्ज्ञ शेतकऱ्यांना 'मोनोलव्हर' असे संबोधू लागले आहेत. जुलै २०१३ मध्ये बिहारमधील सारन जिल्ह्यात कीटकनाशकाच्या रिकाम्या डब्यात ठेवलेल्या तेलाचा वापर अन्न शिजविताना केल्याने २३ विद्यार्थ्यांना प्राण गमवावे लागले होते.पिकांवरील इवल्या-इवल्या अळ्या व सूक्ष्म किडींचा नाश करण्यासाठी सर्रास वापरण्यात येणाऱ्या कीटकनाशकांचे काही थेंबही मानवासाठी जीवघेणे ठरतात. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे मोनोक्रोटोफॉस हे कीटकनाशक अमरिकेत वापरण्यास मनाई आहे. खोकल्याच्या औषधासाठी प्रिस्क्रिप्शन,जहाल विषाची मात्र खुली विक्री!खोकल्याचे सीरप खरेदी करावयाचे असेल, तर 'प्रिस्क्रिप्शन'ची सक्ती आहे. तथापि, मृत्यूचा अचूक ठाव घेणारे कीटकनाशकरूपी हत्यार सर्वत्र अनिर्बंधपणे वापरले जात आहे. अशी जहाल विषे खुल्या विक्रीपासून कशी रोखावी, हा वादाचा विषय ठरू शकतो. तथापि, किडी मारणारी, पण मनुष्य जीवनाला घातक नसलेली कृषिरसायने शोधणे हाच यावरील निश्चित उपाय ठरू शकेल.