शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कीटक प्रतिबंधक नियमावली अखेर शासनाकडे

By admin | Updated: June 11, 2014 00:03 IST

आरोग्य विभागाने तयार केलेल्या उपविधी ( नियमावली) २०१३ मुख्यसभेची मान्यता मिळाल्याने लवकरच राज्यशासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

राज्य शासनाच्या मान्यतेनंतरच होणार अंमलबजावणीपुणे : कीटकजन्य आजारांना कारणीभूत असलेल्या डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने तयार केलेल्या उपविधी ( नियमावली) २०१३ मुख्यसभेची मान्यता मिळाल्याने लवकरच राज्यशासनाकडे पाठविण्यात येणार आहे. ही उपविधी मान्य झाल्यास ज्या ठिकानी डासांची उत्पत्ती आढळून येईल अशा संबधित मिळकतधारकाकडून १ हजार रूपयांचा दंड आकारण्यात येणार असून हा गुन्हा सातत्याने झालेला आढळल्यास दररोज १०० रूपयांप्रमाणे दंड आकारण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील कीटकजन्य आजारांवर नियंत्रण आणण्यास महापालिकेस आणखी कठोर पावले उचलणे शक्य होणार असल्याचे महापालिकेच्या कीटक प्रतिबंधक विभागाच्या प्रमुख डॉ. वैशाली जाधव यांनी सांगितले. गेल्या काही वर्षात शहरात मोठ्या प्रमाणात कीटकजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. हे आजार प्रामुख्याने डासांपासून होत असल्याने या आजारांवर नियंत्रणासाठी महापालिका स्तरावर नियमावली करावी असे आदेश शासनाने ऑक्टोबर १९९६ मध्ये दिले होते. त्याचा आधार घेत मागील वर्षी महापालिकेने पुणे महानगरपालिका ( मलेरिया, डेंग्यु व डासांपासून उत्पन्न होणारे इतर आजार तसेच कीटकांपासून होणारे रोग) उपविधी २०१३ तयार केली होती. या उपविधीनुसार, खासगी जागा तसेच शासकीय जागांमध्ये डासांची उत्पत्ती आढळल्यास महापालिका प्रशासना दंडाची तरतूद तसेच फौजदारी गुन्हा दखल करण्याबाबत नियम प्रस्तावित करण्यात आले होते. या उपविधीसाठी सप्टेंबर २०१३ मध्ये महापालिकेने एक महिन्याची मुदत देऊन नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागविल्या होत्या. मात्र, त्यासाठी शहरातील एकाही नागरिकाने अथवा संस्थेने हरकत घेतलेली नाही. त्यामुळे प्रशासनाकडून ही उपविधी महिला आणि बालकल्याण समितीच्या माध्यमातून मुख्यसभेच्या अंतिम मान्यतेसाठी पाठविण्यात येणार होती. मात्र, समितीने पुन्हा एकदा हरकती मागविण्याचा ठराव करून ही उपविधी मुख्यसभेत मान्यतेसाठी पाठविली होती. मात्र, मुख्यसभेत त्यास उपसूचना देऊन ती थेट राज्यशासनाकडे पाठविण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे आता उपविधीस राज्यशासनाच्या मान्यतेची औपचारिकता बाकी असल्याचे डॉ. जाधव यांनी स्पष्ट केले.