शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्त धान्यात कीड,लाकूड, दगडही!

By admin | Updated: June 9, 2016 01:32 IST

शिर्सुफळ सिद्धेश्वर निंबोडी (ता. बारामती) येथे स्वस्त धान्य दुकानामध्ये दगड, लाकडे, मातीमिश्रित तसेच कीड लागलेले धान्य मिळते.

पारवडी : शिर्सुफळ सिद्धेश्वर निंबोडी (ता. बारामती) येथे स्वस्त धान्य दुकानामध्ये दगड, लाकडे, मातीमिश्रित तसेच कीड लागलेले धान्य मिळते. यामुळे हे धान्य पाळीव जनावरांना खाऊ घालावे लागते. पर्यायाने दारिद्य्ररेषेखालील शिधापत्रिकाधारकांना बाजारातून जास्त दराने धान्य खरेदी करावे लागत आहे.येथील स्वस्त धान्य दुकानात पाहणी केली असता, ९० टक्के ग्राहकांना मिळणारे धान्य दगडमिश्रित तसेच कचरा असल्याचे समोर आले आहे. याबाबत दुकानदाराला विचारले असता, ‘आम्ही वरून आलेल्या धान्याचे वाटप करतो. याबाबतीत आम्हाला काहीही माहिती नसते’; तसेच दुकानाबाबतीत माहिती विचारली असता ‘महिनाअखेरीस गहू, तांदूळ व रॉकेल मिळते. त्याचे वाटप आम्ही १ तारखेला करतो.’ याबाबत माहिती घेण्यासाठी तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. (वार्ताहर)सुप्यात नागरिकांना धान्य मिळेनासुपे : सुपे परिसरात शिधापत्रिकेवर मिळणारे धान्य शासनाने ठरवून दिलेल्या पद्धतीनुसार मिळत नसल्याची तक्रार परिसरतील ग्रामस्थांनी केली आहे. शासनाच्या वतीने अन्नसुरक्षा योजना तसेच अंत्योदय योजना राबवित असताना रेशनिंग दुकानदार कमी धान्य देत असल्याची तक्रार केली आहे. रेशनिंग दुकानदार कुटुंबातील पाच व्यक्तींमागे चार व्यक्तींच्या धान्याचे वाटप करतात. अंत्योदय योजनेतही हाच सावळा गोंधळ होत असल्याची तक्रार रेशनिंग कार्डधारकांनी केली आहे.>नवकार्डधारक धान्यापासून वंचितकाऱ्हाटी : परिसरात हाताला काम नाही, प्यायला पाणी नाही, जनावरांना चारा नाही. त्यातच नव्याने रेशन कार्ड धारकाला शासन मंजुरी नसल्याने १५० कुटुंबांना लाभ घेता येत नाही. धान्य मिळत नसल्याने या कुटुंबांनी नाराजी व्यक्त केली.दुष्काळात रेशनिंगचा माल मिळत असल्याने अनेक कुटुंबांना रेशनिंग आधार बनला आहे. मात्र, नवकार्ड धारकांना धान्य मिळत नसल्याने ऐन दुष्काळात महागडे धान्य विकत घ्यावे लागत आहे. काऱ्हाटीतील ५४३ कुटुंबांना रेशनचे धान्य मिळते. त्यांत ३४२ अन्नसुरक्षा योजनेतील, ५७ बीपीएल, १४४ अंत्योदयमधील कुटुंबांना रेशनचे धान्य दिले जाते. रेशन दुकानचालक चंद्रकांत लोणकर यांनी या कार्डधारकांना धान्य मिळण्यासाठी वरिष्ठांकडे कागदपत्रे पाठविली असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.