शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

२०० दिवस कामावर गैरहजर राहणा-या ‘त्या’ हवालदाराला न्यायालयाकडून दिलासा नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 02:43 IST

सलग २०० दिवस कामावर गैरहजर राहणा-या हवालदाराला बडतर्फ करण्याचा पोलीस विभागाचा निर्णय योग्य ठरवत उच्च न्यायालयाने संबंधित हवालदाराला दिलासा देण्यास नकार दिला. याचिकाकर्ता पोलीस विभागात कामाला असूनही तो अनिश्चित काळासाठी कामावर गैरहजर राहिला. त्यामुळे प्रशासकीय लवादाने दिलेला निर्णय योग्य आहे, असे न्यायालयाने म्हटले.

मुंबई : सलग २०० दिवस कामावर गैरहजर राहणा-या हवालदाराला बडतर्फ करण्याचा पोलीस विभागाचा निर्णय योग्य ठरवत उच्च न्यायालयाने संबंधित हवालदाराला दिलासा देण्यास नकार दिला. याचिकाकर्ता पोलीस विभागात कामाला असूनही तो अनिश्चित काळासाठी कामावर गैरहजर राहिला. त्यामुळे प्रशासकीय लवादाने दिलेला निर्णय योग्य आहे, असे न्यायालयाने म्हटले.हवालदार दिलावर मुल्ला १९८६ पासून पोलीस विभागात हवालदार म्हणून काम करत आहेत. ते सलग २०० दिवस कामावर गैरहजर राहिल्याने २०१० मध्ये त्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना कामावरून काढण्यात आले. या निर्णयाविरुद्ध दिलावर मुल्ला यांनी प्रशासकीय लवादात (मॅट) धाव घेतली. मात्र लवादानेही मुल्ला यांना कामावरून काढण्याचा पोलीस विभागाचा निर्णय योग्य ठरवला.मॅटच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. आपल्या कृत्याच्या मानाने देण्यात आलेली शिक्षा खूप कडक आहे, असे मुल्ला यांनी याचिकेत म्हटले आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. व्ही.के. ताहिलरमाणी व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठापुढे होती.मुल्ला १७ सप्टेंबर २००७ पासून २ एप्रिल २००८ पर्यंत कामावर गैरहजर होते. मुल्ला यांची मुले पुण्याला शिकत असून ते कोल्हापूरमध्ये कर्तव्यावर होते. त्यांनी पुण्याला बदली करून मिळावी, यासाठी वरिष्ठांना विनंतीही केली. मात्र त्यांना बदली करून दिली नाही. तसेच मुल्ला यांना नैराश्य आल्याने ते रुग्णालयात होते. दारूचे व्यसन सोडविण्यासाठी त्यांना पुनर्वसन केंद्रात ठेवण्यात आले होते, असेही मुल्ला यांच्या वकिलांनी न्यायालयाला दिले. मात्र न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद फेटाळला.