शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
4
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
5
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
6
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
7
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
8
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
9
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
10
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
11
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
12
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
13
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
14
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
15
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
16
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
17
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
18
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
19
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
20
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."

पर्सिसन नेट मासेमारीला बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2016 02:22 IST

राज्यातील पर्सिसन नेट मासेमारीला पारंपरिक मासेमारी क्षेत्रात (१२ नॉटिकल्स माइल्सच्या पुढे) बंदी घालणार असल्याचे आश्वासन मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिले

मुंबई : राज्यातील पर्सिसन नेट मासेमारीला पारंपरिक मासेमारी क्षेत्रात (१२ नॉटिकल्स माइल्सच्या पुढे) बंदी घालणार असल्याचे आश्वासन मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या शिष्टमंडळाला विधान भवनात झालेल्या बैठकीत दिले. समितीचे मुंबई जिल्हाध्यक्ष किरण कोळी यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या शिष्टमंडळाने नुकतीच खोतकर यांची विधान भवनात भेट घेतली तेव्हा हे आश्वासन त्यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. या वेळी झालेल्या बैठकीत मत्स्यव्यवसाय आयुक्त मधुकर गायकवाड, सहआयुक्त विनोद नाईक, किरण कोळी, राजन मेहेर, मोरेश्वर पाटील, उज्ज्वला पाटील, परशुराम मेहेर, रमेश मेहेर, नारायण कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.सरकारच्या अध्यादेशानुसार पर्सिसिन नेट मासेमारी विशेष आर्थिक क्षेत्र (एऐ) राज्य सरकारला अधिकार नसताना मासेमारी करण्याचे चुकीचे लेखी आदेश काढले. १२ सागरी मासेमारी क्षेत्रात प्रदूषित कारखाने, शुद्धीकरण न करता सोडले जाणारे सांडपाणी, प्लास्टीकच्या पिशव्या, ओएनजीसी व इतर कंपन्यांच्या कच्च्या तेलाच्या प्रदूषणामुळे १२ वाव सागरी क्षेत्र अत्यंत प्रदूषित झाले आहे. पर्सिसन मच्छीमार मोठे मासे जाळी तोडून जाऊ नयेत म्हणून डिझेल/केमिकलचा वापर करतात. या वापरामुळे समुद्राच्या प्रदूषणातही वाढ होते, असे मच्छीमार कृती समितीने म्हटले आहे. ट्रॉलर्सच्या वापरामुळे माशांची अंडी आणि जैविकतेवर मोठा परिणाम होतो. त्यामुळे ३५ सागरी वावच्या आत नाशवंत मासेमारीस परवानगी देऊ नये, अशी आग्रही मागणीही त्यांनी केली.पारंपरिक मच्छीमारांचे संरक्षण होण्यासाठी राष्ट्रीय सागरी मासेमारी धोरण-२०१६च्या कायद्यामध्ये रायगडच्या मुरूडपासून ते पालघरच्या झाईपर्यंतचे विशेष आर्थिक क्षेत्र पारंपरिक डोल नेट व दालदी मच्छीमारांकरिता राखीव ठेवण्याची शिफारस करण्यात यावी, अशी मागणी किरण कोळी यांनी या वेळी केली.या वेळी मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मत्स्यव्यसाय आयुक्तांना सांगितले की, समितीने दिलेली माहिती भयावह आणि चिंता व्यक्त करणारी आहे. पारंपरिक मच्छीमार किती खोल क्षेत्रात मासेमारी करतात याचा मत्स्यव्यवसाय खात्याने अहवाल तयार करून प्रस्ताव त्वरित तयार करावा असे आदेश दिले. आपण स्वत: केंद्रीय कृषिमंत्री यांची भेट घेऊन विशेष आर्थिक क्षेत्राच्या ३५ वावापर्यंत खोल समुद्रातील पारंपरिक डोल नेट व दालदी मच्छीमारांकरिता राखीव ठेवण्याची शिफारस करून पर्सिसन मासेमारीला पारंपरिक मासेमारी क्षेत्रात बंदी घालण्यास सांगू, असे ठोस आश्वासन दिले. (प्रतिनिधी)