शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
2
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
5
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
6
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
7
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
8
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
9
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
10
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
11
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
12
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
13
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
14
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
16
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
17
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
18
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
19
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
20
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक

१२५ विद्यार्थ्यांच्या पालकांचे प्रवेशासाठी संमतीपत्र

By admin | Updated: November 10, 2016 00:15 IST

पाळा आदिवासी निवासी आश्रमशाळेमधील विद्यार्थ्यांचे दुसऱ्या शाळांमध्ये समायोजन करण्यात येणार आहे.

ऑनलाइन लोकमतखामगाव, (जि.बुलडाणा), दि. 10 - पाळा आदिवासी निवासी आश्रमशाळेमधील विद्यार्थ्यांचे दुसऱ्या शाळांमध्ये समायोजन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने आदिवासी विभागाचे विविध पथके विद्यार्थ्यांच्या गावात पोहचले असून १२५ विद्यार्थ्यांच्या पालकांनी समायोजनाबाबत संमतीपत्र दिल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पाळा येथील आदिवासी निवासी आश्रमशाळेमधील विद्यार्थींनींवरील अत्याचार प्रकरण उघडकीस आल्यानंतर या शाळेची मान्यता रद्द करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मुख्याध्यापकांसह ८ जणांना निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे आश्रम शाळेतील ३८८ विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवाळीच्या सुट्टया असल्याने सर्व विद्यार्थी आपल्या मुळ गावी गेले आहेत. त्यामुळे आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांनी विविध पथके तयार करुन विद्यार्थ्यांच्या पालकांकडे पाठविले आहेत. या शाळेमध्ये अकोला, वाशिम, बुलडाणा, जळगाव आणि अमरावती या पाच जिल्ह्यामधील ५२ गावातील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे संबंधित ५२ गावात पथके पाठविण्यात आली आहेत. अद्याप पर्यंत १२५ विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश दुसऱ्या शाळेंमध्ये करण्यासाठी संमतीपत्र दिले आहेत. १५ नोव्हेंबर पर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे समायोजन विविध शाळांमध्ये पालक व विद्यार्थ्यांच्या समंतीनुसार केले जाईल,अशी माहिती आदिवासी प्रकल्प अधिकारी सोनोने यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांची कागदपत्रे पोलीसांच्या ताब्यातपाळा येथील आदिवासी विभागाच्या आश्रमशाळेमधील ३८८ विद्यार्थ्यांचे सर्व कागदपत्रे पोलीसांनी ताब्यात घेतले आहेत. या शाळेमध्ये प्रवेश दाखविण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची सत्यता पडताळण्यासोबतच विद्यार्थ्यांची नावे व इतर माहिती तसेच शाळेमधील तपासासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे पोलीसांनी ताब्यात घेतली आहेत. या शाळेमध्ये बोगस विद्यार्थी असण्याची शक्यता असून आदिवासी विभागाकडून याबाबीची तपासणी केली जाणार आहे. दरम्यान निवासी आश्रम शाळेवर चार पोलीसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. समुपदेशनासाठी कार्यक्रम तयार करा - नागरगोजेपाळा येथील आश्रम शाळेच्या पिडीत विद्यार्थीनीसोबतच सर्व विद्यार्थीनींचे समुपदेशन करण्यासाठी कार्यक्रम तयार करण्याचे निर्देश महिला व बालविकास आयुक्त डॉ.के.एम.नागरगोजे यांनी बुधवारी दिले आहेत. या आश्रम शाळेतील विद्यार्थीनींचा वेगवेगळ्या शाळांमध्ये प्रवेश केल्या जाणार आहे. त्यामुळे संबंधित सर्व शाळांमध्ये जावून विद्यार्थीनींची माहिती घ्यावी. त्याचप्रमाणे त्यांचे समुपदेशन करावे. यासोबतच पिडीत विद्यार्थीनींची प्रत्येक महिन्याला भेट घ्यावी, असेही नागरगोजे यांनी बालकल्याण समितीला सांगितले आहे. दुसऱ्या पिडीत विद्यार्थीनीला मनोधैर्य योजनेतून मदत देण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. बैठकीला उपआयुक्त बोरखेडे, महिला व बालविकास अधिकारी पी.एस. एंडोले, बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष मंगला सपकाळ, प्रेमलता सोनोने आदी उपस्थित होते.संस्थाचालक संघटनेची आश्रम शाळेला भेटपाळा येथील निवासी आश्रम शाळेला विभागीय संस्थाचालक संघटनेने बुधवारी भेट दिली. घडलेल्या घटनेबाबत पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त केला. यावेळी विभागीय अध्यक्ष किरणराव सरनाईक तसेच सोमटकर, भाऊसाहेब काळे, धनंजय रोठे, अशोकराव कांबळे, आशुतोष लांडे आदिंची उपस्थिती होती.