शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

‘मेक इन इंडिया’च्या कार्यक्रमाला नाकारली परवानगी

By admin | Updated: January 29, 2016 01:57 IST

भाजप सरकारचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या ‘मेक इन इंडिया’ला गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने झटका दिला. ‘मेक इन इंडिया’मध्ये राज्याचे अस्तित्त्व दाखवण्यासाठी राज्य सरकारने

मुंबई : भाजप सरकारचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या ‘मेक इन इंडिया’ला गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने झटका दिला. ‘मेक इन इंडिया’मध्ये राज्याचे अस्तित्त्व दाखवण्यासाठी राज्य सरकारने १ फेब्रुवारीपासून १५ फेब्रुवारीपर्यंत मुंबईत वेगवेगळया ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले आहेत. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून १४ फेब्रुवारी रोजी ‘महाराष्ट्र नाइट’ हा सांस्कृतिक कार्यक्रम गिरगाव चौपाटीवर आयोजित करण्यात येणार होता. मात्र गिरगाव चौपाटीवर हा कार्यक्रम आयोजित करण्यास उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. हे आयोजन अपावादात्मक नसल्याचे सांगून न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले.देशातील व परदेशातील महत्त्वाच्या व्यक्ती येणार यासाठी यापूर्वी न्यायालयाने स्वीकारलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे म्हणत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दणका दिला.राज्य सरकारतर्फे महाअधिवक्ता श्रीहरी अणे यांनी युक्तिवाद करताना म्हटले की, हा कार्यक्रम ‘अपवादात्मक कार्यक्रम’ करून गिरगाव चौपाटीवर आयोजित करण्याची परवानगी द्यावी. राज्याचा अमृतोत्सव साजरा करण्यासाठी उच्च न्यायालयाने गिरगाव चौपाटीवर कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी दिली होती. या कार्यक्रमासाठी तीन देशांचे पंतप्रधान येणार आहेत. आपल्या देशाच्या पंतप्रधानांसह परदेशातील ५७ अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तीही उपस्थित असणार आहेत. दोन लाख चौ. फूट जागा या कार्यक्रमासाठी लागणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम गिरगाव चौपटीवर साजरा करण्याची परवानगी द्यावी,’ असेही अ‍ॅड. अणे यांनी खंडपीठाला सांगितले.‘२००१ मध्ये नियुक्त केलेल्या समितीने या ठिकाणी केवळ रामलीला, कृष्णलीला, गणेश व दुर्गा मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी परवानगी दिली आहे. याठिकाणी राजकीय सभा व अन्य कार्यक्रम साजरे करण्यास मनाई केली आहे. समितीने आखलेली मार्गदर्शक तत्त्वे राज्य सरकारनेही मंजूर केली होती. त्यामुळे राज्य सरकारने या कार्यक्रमाची गणती ‘अपवादात्मक कार्यक्रमात’ व्हावी, याऐवजी मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा करण्यासाठी अर्ज करायला हवा होता. या कार्यक्रमासाठी परवानगी देण्यात आली तर अनेकजण पुन्हा न्यायालयात परवानगी मागण्यासाठी येतील. तसेच न्यायालयाचा निर्णय मार्गदर्शक तत्त्वांशी विसंगत ठरेल, असे न्यायलय म्हणाले. (प्रतिनिधी)