शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
4
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
5
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
6
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
7
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
8
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
9
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
11
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
12
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
13
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
14
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
15
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
16
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
17
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
18
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
19
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
20
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?

सिंहस्थासाठी कायमस्वरूपी जागा

By admin | Updated: July 14, 2015 23:50 IST

कुंभमेळ्यातील साधुग्रामसाठी कायमस्वरुपी जागा अधिग्रहित करून, जागा मालकांना त्याचा योग्य मोबदलाही देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

नाशिक : कुंभमेळ्यातील साधुग्रामसाठी कायमस्वरुपी जागा अधिग्रहित करून, जागा मालकांना त्याचा योग्य मोबदलाही देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मंगळवारपासून सुरू झालेल्या सिंहस्थ कुंभपर्वाच्या ध्वजारोहण सोहळ्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. नाशिक वगळता अन्यत्र ठिकाणी चार हजार एकर जागा कुंभमेळ्यासाठी उपलब्ध असते, नाशिकला मात्र सव्वातीनशे एकरच जमीन उपलब्ध होत असते. त्यातच पावसाळ्यात कुंभमेळा येत असल्याने मोठे आव्हान असते. शासनाने साधुग्रामसाठी जागा अधिग्रहित करण्याबरोबरच साडेतीनशे मीटर लांबीचे दहा घाट बांधल्याने गोदावरीचे पावित्र्य राखण्यास मदत तर होईलच; परंतु लाखो भाविकांना स्रानासाठी त्याचा उफयोग होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यंदा सर्वांच्या सहकार्याने हरित कुंभ संकल्पना यशस्वी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कुंभमेळ््यासाठी निधीची कमतरता राहणार नसल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंट्टीवार यांनी सांगितले. अध्यात्म व पूर्वजांच्या आशीर्वादाच्या बळावर साजरा होणाऱ्या कुंभमेळ्याद्वारे समाजातील विविध अडचणी व समस्या सोडवण्याची ताकद मिळेल, असे केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले. नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी कुंभमेळ्यानिमित्त करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेतला.आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास, जगद्गुरू श्री रामानंदाचार्य हंसदेवाचार्य, जैन साध्वी मधुसुधाजी, दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ केंद्राचे अण्णासाहेब मोरे यांनीही मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)काश्मीरवर चर्चेचा प्रश्नच नाही - राजनाथसिंहत्र्यंबकेश्वर : भारतीय संस्कृती ही विश्वाला जोडणारी असून, भारतीय संस्कृतीने आजवर मुस्लीम, ख्रिश्चन, यहुदी, पारसी सर्वच समुदायांचा आदर दिला आहे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील. त्यावर कोणाशी चर्चा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी केले. येथील कुशावर्ताजवळ सिंहस्थ महापर्वाच्या ध्वजारोहणानंतर ते म्हणाले, भारत विश्वाचे सांस्कृतिक केंद्र आहे. प्रत्येक देशाची विदेशनीती ठरलेली असते. त्यानुसार शेजारी देशांशी मित्रत्वाचे संबंध असावेत, हीच भारताची इच्छा आहे. त्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानकडे मैत्रीसाठी हात पुढे केला आहे. परंतु पुन्हा वाईट अनुभव आल्यास भारत त्याला सडेतोड उत्तर देईल, असा इशारा त्यांनी दिला.ब्रह्मनादात फडकली धर्मध्वजा!प्रभातसमयी ६ वाजून १६ मिनिटांनी सिंह राशीत गुरू आणि रवि प्रवेशकर्ते झाले अन् गोदातटी उभारलेल्या ४० फुटी ध्वजस्तंभावर सदाचार, सत्प्रवृत्ती, सद्वर्तन आणि त्याग-शौर्याची प्रतीक असलेली केशरी धर्मध्वजा ढोल-नगारे, शंखध्वनीच्या ब्रह्मनादात दिमाखात फडकली. एकीकडे धर्मध्वजा स्थापित होत असताना श्रीरामनाम आणि श्रीपवनसुत हनुमानाचा जयघोष करत श्रद्धाळूंच्या गर्दीने काठोकाठ भरलेला गोदाघाट आनंदसोहळ्यात भाव-भक्तीरसाने न्हाऊन निघाला. धर्मध्वजारोहण सोहळ््यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. असा आहे धर्मध्वज!रामकुंडाजवळ गोदावरी मंदिराजवळ पाचशे किलो पितळी धातूपासून बनविण्यात आलेला ४० फुटी ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. त्यावरील धर्मध्वज केशरी रंगात असून, त्यावर एका बाजूला सिंह तर दुसऱ्या बाजूला अमृतकलश आणि ॐ आणि श्री हे शुभचिन्ह आहे. १५ बाय ४.५ फूट असलेला हा धर्मध्वज नाशिकचे दुर्गेश खैरनार यांनी तयार केला आहे. हा धर्मध्वज ११ आॅगस्ट २०१६ पर्यंत फडकणार आहे.कुंभमेळ्यासाठी रेल्वेची २५ कोटींची कामेमुंबई : नाशिकमध्ये कुंभमेळ्यास सुरुवात झाली असून, यासाठी मध्य रेल्वेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. देशभरातून लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी नाशिक रोड स्थानकात नवीन प्लॅटफॉर्म, पिण्याच्या पाण्याची सोय, प्रसाधनगृहे, जादा आरक्षण खिडक्या यांसारख्या पायाभूत सोयी-सुविधांसाठी मध्य रेल्वेकडून २५ कोटी ८ लाखांचा निधी खर्च करण्यात आला आहे. प्रवाशांसाठी विशेष जादा गाड्याही सोडण्यात आल्या आहेत. शाही स्नानासाठी नाशिकमध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या वाढेल. हे पाहता मध्य रेल्वेने पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर दिला आहे. नाशिक रोड स्थानकात चौथा अतिरिक्त प्लॅटफॉर्म तयार करतानाच रॅम्पही बनवण्यात आला आहे. सध्या स्थानकात १७१ पाण्याचे नळ असून, आणखी ६0 नळ याव्यतिरिक्त ६0 स्वच्छतागृहे, २२ अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू केल्या जाणार आहेत.