शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

परसबाग फुलवून ‘अ‍ॅनिमिया’मुक्ती!

By admin | Updated: April 24, 2017 03:28 IST

गावागावात ‘पारसबाग’ फुलवून, त्यातून सेंद्रीय पद्धतीने पोषक भाजीपाला पिकवून अ‍ॅनिमियावर मात करण्याचा प्रयोग विदर्भात यशस्वी झाला आहे

जीवन रामावत /नागपूरगावागावात ‘पारसबाग’ फुलवून, त्यातून सेंद्रीय पद्धतीने पोषक भाजीपाला पिकवून अ‍ॅनिमियावर मात करण्याचा प्रयोग विदर्भात यशस्वी झाला आहे. स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन उभारलेला हा ‘अ‍ॅनिमिया’ मुक्तीचा लढा उभारला आहे.भारत जागातील ७६ कुपोषित (उपाशी) देशांच्या सूचीमध्ये ५५ व्या क्रमांकावर आहे. देशात १९६० मध्ये जेव्हा हरित क्रांतीची सुरुवात झाली, तेव्हा केवळ काहीच राज्यात नगदी पिके घेतली जात होती. त्यात कापूस हे मुख्यत: कोरडवाहू जमिनीत घेतल्या जात होते. विदर्भातील ते पारंपरिक पीक होते. मात्र, शेतकरी या पिकासोबतच ज्वारी, भुईमूग, तूर, भाजीपाला व बाजरी यासारखी पारंपरिक पिके घेऊन आपल्या कुटुंबाची पोषक आहाराची गरज पूर्ण करीत होते. मात्र, हरित क्रांतीनंतर शेतकऱ्यांनी या पोषक अन्नपिकांकडे पाठ फिरवून सोयाबीन आणि कापूस या नगदी पिकांना प्राधान्य दिले. त्यामुळे स्वत: शेतकरी आपल्या कुटुंबाच्या अन्नाची गरज भागविण्यासाठी बाजारातून धान्य विकत घेऊ लागला. यामुळे शेतीचा खर्च वाढला, कर्ज वाढले आणि शेतकऱ्यांचा तोटाही वाढला. एवढेच नव्हे, तर शेतकरी कुटुंबाच्या ताटातील पोषक अन्नही गायब झाले. रासायनिक खते व विषारी औषधाचा भडिमार करून पिकविलेले अन्नधान्य बाजारात आले. कुपोषण आणि अ‍ॅनिमिया यांसारख्या समस्या तयार झाल्या.या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी सर्वांत सरळ आणि सोपा उपाय म्हणजे, आहारात बदल करणे. भाजीपाल्याने ‘अ‍ॅनिमिया’ची कमतरता भरून काढता येते. ही गोष्ट लक्षात घेऊन, विदर्भातील तब्बल २० स्वयंसेवी संस्थांमधील महिला आणि किशोरवयीन मुलींनी शाळा व ग्रामीण भागात पोषक आणि सेंद्रीय ‘परसबाग’ विकासाचे काम हाती घेतले आहे. त्या परसबागेतून ग्रामीण भागातील लोकांना पोषक आणि सेंद्रीय भाजीपाला उपलब्ध होऊन ‘अ‍ॅनिमिया’ची समस्या सोडविण्यास मदत होत आहे.