शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यासक्रमाचा कालबद्ध आढावा आवश्यक - मुख्यमंत्री

By admin | Updated: May 29, 2017 04:39 IST

विद्यापीठात शिकवले जाणारे अभ्यासक्रम आणि उद्योगजगताची आवश्यकता यात समन्वय असणे आवश्यक आहे. राज्य सरकारच्या

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विद्यापीठात शिकवले जाणारे अभ्यासक्रम आणि उद्योगजगताची आवश्यकता यात समन्वय असणे आवश्यक आहे. राज्य सरकारच्या नव्या विद्यापीठ कायद्यामुळे विद्यापीठांना आवश्यकतेनुसार अभ्यासक्रमात कालानुरूप बदल करणे शक्य होणार आहे. विद्यापीठ कायद्यातील सुधारणा आणि अ‍ॅपे्रंटिसशिप कायद्यातील बदलांमुळे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमात फडणवीस यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी शैक्षणिक अभ्यासक्रमाचा आराखडा, नवीन विद्यापीठ कायद्यातील सुधारणा, अ‍ॅप्रेंटिसशिप कायद्यातील बदलामुळे रोजगाराच्या उपलब्ध संधी आदी विषयांवर भाष्य केले. मुख्यमंत्री म्हणाले की, आपल्या शिक्षणपद्धतीत आतापर्यंत पुस्तकी ज्ञानावरच अधिक भर देण्यात आला आहे. सध्याचा बदलता काळ आणि बाजारपेठेमधली सद्य:स्थिती याचा विचार केला असता, आजच्या विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच विविध कंपन्यामध्ये जाऊन प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ज्याप्रमाणे, दर दहा वर्षांनी शहराचा विकास आराखडा तयार केला जातो, त्याच धर्तीवर शिक्षणक्षेत्रात होणारे बदल लक्षात घेत, दर पाच वर्षांनी अभ्यासक्रमाचा आढावा घेणे आवश्यक आहे. महाविद्यालयांना स्वायत्तता दिल्यास ती अधिक चांगल्या पद्धतीने विकास करू शकतात. जोपर्यंत विद्यापीठ अभ्यासक्रमामध्ये बदल करीत नाही, तोपर्यंत महाविद्यालयांना किंवा शैक्षणिक संस्थांना बदल करता येत नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. मात्र, सध्या तरी अभ्यासक्रमाच्या सूत्रात बदल करण्यात येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कलमापन चाचणीमुळे योग्य ते करिअर निवडण्याचा विश्वास विद्यार्थ्यांना मिळणार आहे. अभ्यासाप्रमाणे खेळातही चांगले करिअर होऊ शकते. राज्यात चांगले खेळाडू घडावेत, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. कायद्यानुसार शाळांना मैदान असणे अनिवार्य करण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कौशल्य विकास हाच आधारकौशल्य विकासाच्या आधारेच रोजगार व स्वयंरोजगाराचे प्रश्न सोडविणे शक्य होणार आहे. अ‍ॅप्रेंटिसशिप कायद्यात बदल केल्याने राज्यात सर्वाधिक अ‍ॅप्रेंटिस आहेत. यापूर्वी या कायद्यामधील काही जाचक अटींमुळे कोणीही अ‍ॅप्रेंटिस ठेवायला तयार नसायचे. पहिल्या वर्षी ६९ हजार, तर गेल्या वर्षी एक लाख अ‍ॅप्रेंटिस होते. उद्योगांशी विविध २४ सामंजस्य करारानुसार, आतापर्यंत आठ लाख तरुणांना विशेष कौशल्य प्रशिक्षण देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. शेती आणि शेतीपूरक उद्योगातील प्रशिक्षणासाठी अभ्यासक्रम तयार करण्यात आल्याचेही फडणवीस यांनी या कार्यक्रमादरम्यान विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.