शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रक्षाबंधनाच्या पर्वावर अंध मुलांची डोळस कामगिरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 15:34 IST

जन्मत: नेत्रहीन असल्याने संपूर्ण आयुष्य अंधकारमय असतानाही अप्रतिम राख्या बनवून डोळसांना लाजविणारी कामगिरी वाशिम तालुक्यातील केकतउमरा येथील चेतन सेवांकुर या ग्रुपच्या अंध मुलांनी केली आहे.

वाशिम, दि. 6 - जन्मत: नेत्रहीन असल्याने संपूर्ण आयुष्य अंधकारमय असतानाही अप्रतिम राख्या बनवून डोळसांना लाजविणारी कामगिरी वाशिम तालुक्यातील केकतउमरा येथील चेतन सेवांकुर या ग्रुपच्या अंध मुलांनी केली आहे. रक्षाबंधनाच्या पर्वावर त्यांनी केलेला हा उपक्रम सर्वांसाठी आदर्श ठरावा असाच आहे.जन्मत: डोळे नसल्यामुळे संपूर्ण आयुष्यात अंधकार पसरलेला असताना चेतन उचितकर याने चेतन सेवांकूरमधील आपल्या अंध मित्रांच्या सहाय्याने मनात कुठलीही निराशा अथवा खंत न बाळगता ईश्वराने दिलेल्या तल्लख बुद्धीच्या जोरावर संगीत कला हस्तगत केली आहे. केवळ वाशिम जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासह, गुजरात, गोवा, आंध्र प्रदेश, केरळ, इत्यादी राज्यांतही आपल्या याच कलेद्वारे  शेतकरी आत्महत्यांसह व्यसनमुक्तीबाबत प्रबोधनपर कार्यक्रम राबवून समाजाला प्रोत्साहित करण्याचे कार्य केले आहे. लग्न समारंभातील कार्यक्रमासह पथनाट्य, व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आपली उपजीविका करणा-या चेतन सेवांकुर दिव्यांग फाउंडेशनच्या दृष्टिहीन अंध सदस्यांनी रक्षाबंधनाच्या पृष्ठभूमीवर उपजीविकेचा पर्याय म्हणून राख्या निर्माण करण्याचे काम सुरू केले. त्यानुसार हजारो राख्या तयार केल्या आणि अकोला येथील जागृती विद्यालय अकोला, भारत विद्यालय अकोला व जिजाऊ वाडा आदी ठिकाणी एका दिवसात तब्बल 15 हजार रुपयांच्या राख्यांची विक्री केली. त्याशिवाय वाशिम जिल्ह्यातही राखी पौर्णिमेनिमित्त वेगवेगळ्या शाळांसह इतर ठिकाणी ते राख्या विकत आहेत. एकीकडे ऐहिक सुखात हिरावून जात गैरमार्गाचा अवलंब करून शिक्षित तसेच उच्चशिक्षित वर्ग आत्महत्येचा मार्ग स्वीकारत असताना दुसरीकडे डोळे नसतानाही राख्या निर्मितीचे कठीणतम कार्य करून रोजगार मिळवून उपजीविका चालविणा-या या अंध मुलांनी आपली जिद्द व चिकाटी, परिश्रम व जगण्याची उमेद या माध्यमाने दाखवून दिली आहे.चेतन सोबत लक्ष्मी बळीराम वाघ, प्रविण रामकृष्ण कठाळे, कैलास वसंतराव पानबुडे, संदीप केशव भगत, अमोल अर्जुन गोडघासे, तुळशिराम श्रीकांत तिवारी, रुपाली सोपान फुल सावंगी, या अंध मुलांनी सुंदर आकर्षक, व स्वस्त अशा राख्यांची निर्मिती केली आहे.संगीतमय आर्केस्ट्रा चालवून स्वताचा उदरनिर्वाह करणा-या हा चिमुकला चेतन शेतकरी आत्महत्या, नेत्रदान, बेटी बचाव बेटी पढाव, स्त्रीभ्रूणहत्या, व्यसनमुक्ती अभियान, अशा विविध कार्यक्रमांद्वारे व्याख्यान देवून सामाजिक उपक्रमावर जनजागरण करून समाज सेवेचे व्रत अंगीकारले आहे. चेतन याचा 30 जुलै रोजी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते विशेष गौरव व सत्कार करण्यात आला असून,  खुद्द मुख्यमंत्री पर्रीकर यांनी चेतन याच्या कार्यांबद्दल हा चिमुकला चेतन नव्हे तर छोटा चेतन आहे, असे गौरवोद्गार काढले आहेत.