शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पाच्या तयारीत आता जनतेचा सहभाग

By admin | Updated: December 3, 2015 00:54 IST

राज्याचा महसुली खर्च कमी करणे अथवा उत्पन्न वाढविण्याबाबत सामान्य माणसाकडे बरेचदा चांगल्या कल्पना असतात; मात्र अर्थसंकल्प तयार करणे हे प्रशासकीय काम

मुंबई : राज्याचा महसुली खर्च कमी करणे अथवा उत्पन्न वाढविण्याबाबत सामान्य माणसाकडे बरेचदा चांगल्या कल्पना असतात; मात्र अर्थसंकल्प तयार करणे हे प्रशासकीय काम असल्यामुळे सामान्यांना त्यासाठी सूचना करणे शक्य नसते. त्या अनुषंगाने अर्थसंकल्पाच्या तयारीत जनतेच्या सूचना, कल्पना मागविण्याचा निर्णय राज्य शासनाच्या वित्त विभागाने घेतला असून, जनतेकडून आलेल्या उत्कृष्ट सूचनांना शासनातर्फे बक्षीसही देण्यात येईल.राज्याचा अर्थसंकल्प तयार करताना राज्याच्या उत्पन्नाचे नवे स्रोत, त्याचप्रमाणे प्रशासनातील खर्चामध्ये बचतीच्या अभिनव योजना सुचविण्यासाठी आर्थिक बाबींशी निगडित तज्ज्ञ व्यक्ती, शासकीय अधिकारी, कर्मचारी व सामान्य जनतेचा सहभाग वाढावा, या दृष्टिकोनातून त्यांच्याकडून नावीन्यपूर्ण सूचना मागविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुषंगाने सर्वोत्कृष्ट सूचनांना प्रशस्तिपत्रासह रोख स्वरूपात बक्षिसे देण्याचा निर्णयही वित्त विभागाने घेतला आहे. सूचना पाठविण्याची पद्धतलोकांना आपल्या सूचना पत्रस्वरूपात पाठवता येतील. ही सूचनापत्रे वित्त मंत्री वा अपर मुख्य सचिव (वित्त) यांच्या नावे वित्त विभाग, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई या पत्त्यावर पाठवावीत. याशिवाय ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर आॅनलाइन सहभागी होता येईल. सूचना पाठविणाऱ्यांनी पत्रावर किंवा लिफाफ्यावर ‘अर्थसंकल्पाच्या तयारीसाठी सूचना’ असे ठळकपणे लिहावे. सदर सूचना ३१ डिसेंबरपर्यंत पाठविणे क्रमप्राप्त आहे. (प्रतिनिधी)समिती गठितलोकांनी शासनास पाठविलेल्या सूचना संबंधित विभागाकडे पाठविण्यात येतील. संबंधित विभागामार्फत निवडलेल्या व सचिवस्तरावरील अभियाप्रायास आलेल्या सूचनांवर अभ्यास करण्यासाठी वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात आली आहे.सदर समिती प्राप्त सूचनांची छाननी करेल व बक्षीसपात्र सूचनांचा क्रम ठरवेल.राज्याचा अथर्संकल्प तयार करण्यासाठीच्या सर्वोत्कृष्ट सूचनांना प्रशस्तिपत्रासह रोख स्वरूपात बक्षिसे देण्याचा निर्णय वित्त विभागाने घेतला आहे. बक्षिसांचे स्वरूप - सर्वोत्कृष्ट प्रथम सूचना-१० लाख रुपये- सर्वोत्कृष्ट द्वितीय सूचना-७.५० लाख रुपये- सर्वोत्कृष्ट २५ सूचना -प्रत्येकी १ लाख रुपये