शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जनतेने चीनवर सर्जिकल स्ट्राईक करावा

By admin | Updated: November 13, 2016 21:59 IST

दहशतवादी तळांवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर जगाची भारताकडे पाहण्याची नजर बदलली आहे.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 13 - दहशतवादी तळांवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर जगाची भारताकडे पाहण्याची नजर बदलली आहे. चीन वगळता जगातील सर्व देशांनी भारताला पाठिंबा दिला आहे. चीनला धडा शिकविण्यासाठी आपल्याला मिसाईल किंवा इतर शस्त्रांची आवश्यकता नाही. स्वदेशी वस्तूंचा जास्तीत जास्त वापर करुन जनतेनेच चीनच्या अर्थव्यवस्थेला फटका देणारा सर्जिकल स्ट्राईक करावा, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीची सदस्य व मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे राष्ट्रीय संरक्षक इंद्रेशकुमार यांनी व्यक्त केले. मैत्री परिवार संस्थेतर्फे रविवारी हेमंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  देशाच्या वर्तमान बौद्धिक व युद्धजन्य स्थितीसमोरील आव्हाने व समाधान या विषयावर ते बोलत होते. गेल्या ७० वर्षांपासून पाकिस्तानला समजविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून कुरापती वाढल्या होत्या. सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे पाकिस्तानला झटका बसला आहे. मात्र चीनने पाकिस्तानचे समर्थन केले आहे. त्यामुळे चीनलादेखील धक्का देण्याची आवश्यकता आहे. दिवाळीच्या निमित्ताने अनेकांनी चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकला. हे प्रमाण व्यापक स्वरुपात व्हायला हवे. प्रत्येक धर्म, पंथाने यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असे इंद्रेशकुमार म्हणाले.देशातील भ्रष्टाचार व काळा पैसा यांच्यावर आळा आणण्यासाठी केंद्र शासनाने ह्यनोटह्णबंदी केली आहे. यानंतर अनेक जणांकडून निरनिराळ्या अफवा पसरविल्या जात आहेत. मात्र हा निर्णय देशहितासाठी होता व अशा अफवा किंवा उद्भविलेल्या परिस्थितीमुळे घाबरण्याची आवश्यकता नाही. उलट जनतेने थोडा संयम दाखवून भ्रष्टाचाऱ्यांवर अंकुश आणण्याच्या प्रयत्नांना सहकार्य केले पाहिजे, असे इंद्रेशकुमार म्हणाले.