शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

लोकसंस्कृतीचा गाढा उपासक हरपला...

By admin | Updated: July 2, 2016 04:23 IST

रामचंद्र चिंतामण ढेरे यांचा जन्म २१ जुलै १९३० रोजी पुण्याजवळील निगडे या छोट्याशा गावी झाला.

रामचंद्र चिंतामण ढेरे यांचा जन्म २१ जुलै १९३० रोजी पुण्याजवळील निगडे या छोट्याशा गावी झाला. महापालिका शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर पूना इंग्लिश स्कूल आणि पूना नाईट स्कूलमध्ये त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. १९६६ मध्ये त्यांनी पदवी संपादन केली. दरम्यान हायस्कूलच्या काळात मुद्रितशोधक म्हणून ते एका स्थानिक वृत्तपत्रात काम करीत होते. १९७५ मध्ये त्यांनी पीएच.डी. मिळविली आणि १९८० मध्ये पुणे विद्यापीठाने साहित्यातील डी.लिट्. ही पदवी देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला. डेक्कन कॉलेजकडूनही त्यांना २००४ साली डी.लिट्. देण्यात आली. १९५५ पासूनच ते संत साहित्य, लोककला, देवदेवता, लोकसाहित्य आदी विविध विषयांवर लेखन करीत होते. लेखनाबरोबरच वक्तृत्व शैलीचे वरदान त्यांनी लाभले होते. अनेक सार्वजनिक व्याख्यानमालेमध्ये ते भाषण देत असत. परंतु व्याख्यानांचे विलोभन हा सात्विक मोह आहे, संशोधन कार्यात तो अडसर आहे, या जाणिवेतून त्यांनी आपले लक्ष लेखनावर केंद्रित केले. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीच्या अभ्यासाचा परीघ हा दक्षिणेच्या संस्कृतीशी आणि अभ्यासाशी निगडित आहे, याची जाणीव झाल्याने त्यांनी भारतीय संस्कृतीच्या इतिहासाची परिमाण संशोधनाच्या माध्यमातून तपासण्याच्या दिशेने लेखनप्रवास वळवला. ‘लज्जागौरी’ मधून दैवशास्त्रीय अभ्यास त्यांनी मांडला, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश यामधील देवीदेवतांच्या स्वरूपांचा, रूपकांची मांडणी या पुस्तकातून समोर येते. इतिहासाच्या पाळामुळांशी जाताना अनेक नवीन गोष्टी त्यांनी लेखनाच्या माध्यमातून उजागर केल्या. त्यांच्या संशोधन पद्धतीमध्ये इतिहास आणि सांस्कृतिक अभ्यास यांचा सांगोपांग विचार आढळतो. त्यांच्या अनेक संशोधनपर लेखांवर आक्षेप घेण्यात आले. मात्र त्यांनी कधीही आपले लेखन मागे घेतले नाही.>ग्रंथसंपदा : प्राचीन मराठीच्या नवधारा, रामराज्याची स्फूर्तीकेंद्रे, दत्त संप्रदायाचा इतिहास, शोधशिल्प, भारतीय रंगभूमीच्या शोधात, लोकदेवतांचे विश्व, प्राचीन मराठी वाडमय, खंडोबा, श्री तुळजाभवानी, मुस्लीम मराठी संत कवी, शिखर शिंगणापूर श्री शंभू महादेव.>पुरस्कार : राज्य पुरस्कार १९५९, (दत्त संप्रदायाचा इतिहास, नाथ संप्रदायाचा इतिहास), राज्य पुरस्कार १९६१ (प्रवासी पंडित), राज्य पुरस्कार १९६९ ( मुसलमान मराठी संत कवी), राज्य पुरस्कार १९७१ (श्री नामदेव-एक विजययात्रा), पुणे विद्यापीठ चिपळूणकर पुरस्कार (मुसलमान मराठी संत कवी), साहित्य अकादमी पुरस्कार १९८७ (श्री स्वामी समर्थ धार्मिक), महाराष्ट्र साहित्य परिषदेचा गं. ना. जोगळेकर पुरस्कार २०१३ (श्री विठ्ठल : एक महासमन्वय), त्रिदल फाउंडेशनचा पुण्यभूषण पुरस्कार (१४ मार्च २०१०), पुणे महानगरपालिकेचा महर्षी वाल्मिकी पुरस्कार (२०१३), अखिल भारतीय यादव महासंघाचा विशेष पुरस्कार (२९ मार्च २०१५). चिमण्या गणपती मंडळातर्फे लोकसंस्कृतीचे गाढे ‘साहित्य सेवा सन्मान’ प्रदान करण्यात आला. (२६ फेब्रुवारी२०१६).