शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागाने दुष्काळाशी सामना

By admin | Updated: January 4, 2016 03:13 IST

दुष्काळाने पिचून गेलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसोबतच त्यांच्यातील आत्मविश्वास अधिक घट्ट करण्याचीही गरज आहे. सर्वकाही संपले, अशी भावना निर्माण झाल्यानेच शेतकरी गळफासाकडे वळत असता

प्रताप नलावडे,  बीडदुष्काळाने पिचून गेलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसोबतच त्यांच्यातील आत्मविश्वास अधिक घट्ट करण्याचीही गरज आहे. सर्वकाही संपले, अशी भावना निर्माण झाल्यानेच शेतकरी गळफासाकडे वळत असताना, त्यांच्यात उभारी निर्माण करण्याचे आणि दुष्काळाशी चार हात करण्यासाठी बळ देण्याचे काम अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या ‘नाम फाउंडेशन’ने हाती घेतले आहे. बीड जिल्ह्यातील लोळदगाव येथून त्यांनी या कामाची मुहूर्तमेढ रोवली आहे.पाणीटंचाई हीच शेतकऱ्यांची मोठी समस्या असल्याचे लक्षात आल्यावर, नाना आणि मकरंद यांनी या समस्येबाबत काय करता येईल, याचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. साताऱ्यात डॉ. अविनाश पोळ यांनी पाणलोटच्या केलेल्या कामाचा आढावा घेतला आणि पाणलोटची कामे केली, तर कायमस्वरूपी दुष्काळी परिस्थितीवर मात करता येईल, या निष्कर्षापर्यंत आम्ही सर्व जण पोहोचलो, असे ‘नाम’चे मराठवाडा समन्वयक राजाभाऊ शेळके सांगतात. त्यानुसार, बीड जिल्ह्यात पहिल्यांदा सुरुवात करायची आणि त्यानंतर संपूर्ण मराठवाड्यात कामसुरू करण्याचे ठरले. बीडपासून ८-१० किलोमीटर अंतरावरील लोळदगावया गावाची निवड यासाठी केली. गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून ४ लाख रुपये जमा केले आणि बिंदुसरा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती आणि खोलीकरणाचे काम सुरू करण्यात आले, असे सांगत‘कृषी भूषण’ आणि नामचे जिल्हा समन्वयक शिवराम घोडके म्हणाले, ‘यामुळे गावाचा पाणीप्रश्न सुटणारतर आहेच, परंतु शेजारच्याकिणीपाई, नामलगाव, कुर्ला आणि बेलापुरी या गावांनाही याचा फायदा होणार आहे.’नामचे महाराष्ट्र समन्वयक केशव आघाव यांनी स्वत:च्या ५ पोकलेन मशीन दिल्या असून, आणखी १५ मशीनची व्यवस्था केली आहे. मशीनच्या डिझेलसाठी काही डॉक्टर मंडळींनी पुढाकार घेतला आहे. शासकीय पातळीवर दीड कोटी रुपयांचे बजेट असलेले काम लोकसहभागातून अवघ्या २० लाखांत पूर्ण होऊ लागले आहे. लोकसहभागातून झालेल्या या कामाने एक आदर्श निर्माण केला आहे. बीड जिल्ह्यातून त्याची सुरुवात झाली.