शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

दौंडची जनता दूधखुळी नाही

By admin | Updated: May 17, 2016 02:11 IST

जी कामे पाठपुराव्याच्या माध्यमातून मार्गी लागली ती कोणी केली, हे जनतेला सांगण्याची आवश्यकता नाही.

पाटेठाण : दौंड तालुक्यात रस्ते, वीज, पाणी यासारख्या ज्वलंत विषयांवरील अनेक प्रलंबित कामे दूरगामी दृष्टिकोनातून मार्गी लागलेली असून, जी कामे पाठपुराव्याच्या माध्यमातून मार्गी लागली ती कोणी केली, हे जनतेला सांगण्याची आवश्यकता नाही. तालुक्यातील जनता दूधखुळी नसून सूज्ञ आहे. राजकारणात आजतागायत श्रेयवादाचा विचार न करता प्रामाणिकपणे विकासकामांवर भर देऊन कामे करीत आहे. त्यामुळे तालुक्यातील जनतेने विश्वास ठेवून आमदारपदी काम करण्याची संधी दिली, असे मत आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केले. खामगाव (ता. दौंड) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित २ कोटी ८२ लाख रुपयांच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन व उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला धर्मवीर संभाजीमहाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तालुक्यातून जाणाऱ्या अष्टविनायक रस्ते मार्गामुळे अनेक गावांचा कायापालट होण्यासाठी मदत होईल. वाघोली-राहू-पारगाव रस्त्यासाठी सुमारे १०५ कोटी रुपये निधी अपेक्षित असून ही प्रस्तावित कामे लवकरच मार्गी लागणार आहेत. पाण्यासारख्या ज्वलंत विषयांवर राजकारण न करता एकत्र लढा दिला, तरच भविष्यात शेतीसाठी पाणी मिळणार असून तालुक्यातील अनेक वीज वितरण उपकेंद्रांची क्षमता वाढविण्यात येत आहे. यामुळे विजेची समस्या सुटणार असल्याचे राहुल कुल यांनी सांगितले.या वेळी जिल्हा परिषद सदस्य बंडोपंत नवले म्हणाले, ‘‘विरोधक मंडळींचे मानसिक संतुलन बिघडले असल्याने ते न केलेल्या विकासकामांचेदेखील फुकटचे श्रेय लाटत आहेत.’’ या वेळी ग्रामपंचायतीच्या वतीने अपंग लाभार्थ्यांना मिक्सर तसेच शौचालय लाभार्थ्यांना अनुदानवाटप आमदार कुल यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी भीमा-पाटसचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर, माजी उपसभापती शिवाजी दिवेकर, भीमा-पाटसचे संचालक प्रकाश शेळके, चंद्रकांत नागवडे, पंचायत समिती सदस्य किसन शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता जाधव, एस. आर. गांधी, मोहन म्हेत्रे, बापूसाहेब मेहेर, सरपंच विमल खेडेकर, नंदा यादव, अशोक नागवडे, अनिता कोळपे, कैलास खेडेकर, रोहिदास टिळेकर, प्रदीप जगताप, अप्पाराव कोळपे, ग्रामसेवक राजेंद्र जगताप यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. डॉ. संदीप खेडेकर यांनी प्रास्ताविक केले. विठ्ठल बर्वे यांनी सूत्रसंचालन केले. संतोष नागवडे यांनी आभार मानले. (वार्ताहर)