शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

चारशे कोटींची फसवणूक करणाऱ्याला दंड

By admin | Updated: June 30, 2016 04:30 IST

दोन लाख चौ़ फुटांचा विकास हक्क हस्तांतरण (टीडीआर) लाटल्यानंतर निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या विकासकाला पालिकेने अखेर ७० कोटी रुपये दंड ठोठावला आहे़

मुंबई : प्रकल्पबाधितांसाठी सदनिका बांधण्याच्या बदल्यात महापालिकेकडून दोन लाख चौ़ फुटांचा विकास हक्क हस्तांतरण (टीडीआर) लाटल्यानंतर निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या विकासकाला पालिकेने अखेर ७० कोटी रुपये दंड ठोठावला आहे़ मात्र हा दंड किरकोळ असल्याचा आरोप नगरसेवकांकडून होत आहे़वरळी गोमाता नगर येथील पालिकेच्या भूखंडावर प्रकल्पबाधितांच्या सदनिका बांधण्याच्या बदल्यात बिल्डरला चक्क दोन लाख चौरस फूट विकास हक्क हस्तांतरणाची खिरापत वाटण्यात आली होती़ मात्र बिल्डरने बांधलेल्या या इमारती काही वर्षांत मोडकळीस आल्या आहेत़ त्यामुळे या चारशे कोटी रुपये घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी मनसेने केली होती़ प्रभादेवी परिसरात पालिकेच्या भूखंडावर अशा नऊ इमारती बांधण्यात येणार होत्या़ यासाठी पालिका, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण आणि बिल्डर यांच्यामध्ये करार झाला होता़ नियमांनुसार विकासकाने आरसीसीचे बांधकाम करणे अपेक्षित होते़ परंतु २००६ मध्ये लोड बेअरिंगचे बांधकाम करण्यात आले़ यामुळे काही वर्षांतच ही इमारत धोकादायक ठरली़ रहिवासी हवालदिलसी १ श्रेणीत टाकण्यात आलेली ही इमारत तातडीने खाली करण्यासाठी पालिकेने कारवाई सुरू केली आहे़ मात्र पालिकेच्या इस्टेट विभागानेच या प्रकरणी विकासकावर ठपका ठेवल्यानंतरही कोणतीही कारवाई केलेली नाही, असा आरोप मनसेने केला आहे़ (प्रतिनिधी)दंडाची कबुलीमनसेचे संतोष धुरी यांनी हा विषय सुधार समितीच्या बैठकीत हरकतीच्या मुद्द्याद्वारे आज चर्चेस आणला़ यास सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिला़ मात्र संबंधित विकासकाकडून ७० कोटी रुपये दंड वसूल करण्यात येणार असल्याचे सांगत प्रशासनाने या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला़ मात्र घोटाळा चारशे कोटी रुपयांचा असताना ७० कोटी दंड हा नाममात्रच असल्याचा आरोप सदस्यांनी केला़