शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याच्या दुर्दशेस जबाबदार असलेल्यांना दंड ठोठवा

By admin | Updated: February 28, 2017 02:19 IST

रस्त्यांच्या दुर्दशेस जबाबदार असलेल्या अभियंत्यांना व कंत्राटदारांकडून भरभक्कम दंड आकारा, अशी सूचना राज्य सरकार व महापालिकेला केली.

मुंबई : पावसाळ्यादरम्यान शहरातील एकही रस्ता खराब होता काम नये, याची खात्री करा, असे म्हणत, उच्च न्यायालयाने रस्त्यांच्या दुर्दशेस जबाबदार असलेल्या अभियंत्यांना व कंत्राटदारांकडून भरभक्कम दंड आकारा, अशी सूचना राज्य सरकार व महापालिकेला केली. शहरातील खड्ड्यांसंबंधी चर्चा करण्यासाठी व त्यावर तोडगा काढण्यासाठी उच्च न्यायालयाने मुंबई महापालिका, एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी, बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि वाहतूक विभागाच्या सहआयुक्तांना १० मार्च रोजी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले.रस्त्यांच्या खराब अवस्थेबद्दल विशेषत: पावसाळ्यात रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था असल्याने, उच्च न्यायालयाने याची स्वत:हून दखल घेत, याचिका दाखल करून घेतली आहे. या याचिकेवर न्या. व्ही. एम.कानडे व न्या. पी. आर. बोरा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होती.सोमवारच्या सुनावणीत मध्यस्थींच्या वकिलांनी उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी करण्यात आली नसल्याची माहिती उच्च न्यायालयाला दिली. ‘उच्च न्यायालयाच्या आदेशप्रमाणे नागरिकांच्या खड्ड्यासंबंधी तक्रारी दूर करण्यात येत नाहीत. खड्ड्यांमुळे अद्यापही खूप लोकांचा मृत्यू झाला आहे,’ अशी माहिती मध्यस्थींच्या वकिलांनी खंडपीठाला दिली. मुंबई महापालिकतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी सध्या ६४ मोठे रस्ते आणि १३ जंक्शनचे कामकाज सुरू असून, मेपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती खंडपीठाला दिली.‘आत्तापर्यंत काहीही प्रगती करण्यात आलेली नाही. जरी रस्ते दुरुस्त केले किंवा नवीन बांधले, तरी पावसाळ्यात त्यांची दुर्दशा होतेच,’ असा शेरा खंडपीठाने मारला.‘हे सर्व कोणत्याही विभागात समन्वय नसल्याने होत आहे. त्यामुळे आम्ही महापालिका. एमएमआरडीए, पीडब्ल्यूडी, बीपीटी, एमएसआरडीसी आणि वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पुढील सुनावणीस उपस्थित राहण्याचे निर्देश देत आहोत,’ असे म्हणत, उच्च न्यायालयाने या याचिकेवरील पुढील सुनावणी १० मार्च रोजी ठेवली आहे.वाहतूक विभागामुळे रस्ते दुरुस्त करता येत नाहीत, असे पालिकेने उच्च न्यायालयाला सांगितल्यावर, कोर्टाने प्रत्येक विभागाने रस्ते सुस्थितीत ठेवण्यास प्राधान्य द्यावे, असे म्हटले. (प्रतिनिधी)