शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
5
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
6
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
7
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
8
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
9
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
10
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
12
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
13
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
14
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
15
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
16
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
17
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
18
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
19
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
20
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'

अस्वच्छता पसरवल्यास दंड!

By admin | Updated: September 24, 2016 01:39 IST

मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून ‘स्वच्छ रेल-स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत १७ सप्टेंबरपासून स्वच्छता सप्ताह साजरा केला जात

मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून ‘स्वच्छ रेल-स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत १७ सप्टेंबरपासून स्वच्छता सप्ताह साजरा केला जात आहे. या सप्ताहांतर्गत रेल्वे हद्दीत अस्वच्छता पसरवणाऱ्या प्रवाशांविरोधात दंडात्मक कारवाईचा बडगा उचलला जात असून सात दिवसांत १ हजार ९६७ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. हा सप्ताह २५ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून स्वच्छता सप्ताह साजरा करताना स्थानक, लोकल आणि मेल-एक्स्प्रेस गाड्या, रेल्वे कॉलनीमध्ये स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. तसेच कार्यालय परिसर, लोको शेड व कारखान्यांमध्येही स्वच्छता सप्ताह साजरा केला जात आहे. यानिमित्ताने साफसफाई मोहीम करतानाच जनजागृतीचे कार्यक्रमही केले जात आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे स्वच्छता सप्ताह साजरा करतानाच अस्वच्छता पसरवणाऱ्या प्रवाशांविरोधातही कारवाईचा बडगा उचलण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला. त्यानुसार मध्य रेल्वेवर अस्वच्छता पसरवणाऱ्या १,०९९ प्रवाशांना पकडण्यात आले आणि त्यांच्यावर केलेल्या कारवाईतून ३ लाख एवढा दंड वसूल करण्यात आल्याचे महाव्यवस्थापक अखिल अग्रवाल यांनी सांगितले. १९७ मेल-एक्स्प्रेस ट्रेनपैकी विदर्भ एक्स्प्रेस, दुरोन्तो एक्स्प्रेस, महालक्ष्मी एक्स्प्रेस, जीटी एक्स्प्रेस, अमरावती एक्स्प्रेस, अनुव्रत एक्स्प्रेस, एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेस आणि अन्य काही ट्रेनमधील जवळपास १५ हजार ७५१ प्रवाशांशी स्वच्छतेबाबत संपर्क साधण्यात आला. त्यातून १९२ जणांनी स्वच्छतेविषयी तक्रारी केल्या आणि यातील जवळपास १६८ तक्रारी सोडवल्याचे त्यांनी सांगितले. पश्चिम रेल्वेवरही अशाच प्रकारची कारवाई करताना ८६८ प्रवाशांना पकडण्यात आले. त्यांच्यावर केलेल्या कारवाईतून ८६ हजार रुपये एवढा दंड वसूल केल्याचे साहाय्यक विभागीय रेल्वे व्यवस्थापक सौरभ प्रसाद यांनी सांगितले. (प्रतिनिधी)>पश्चिम रेल्वेवर ३,१०० जणांवर कारवाईअस्वच्छता पसरवल्याने आॅगस्ट महिन्यात पश्चिम रेल्वेवरील सर्व स्थानकांत केलेल्या कारवाईत ३,१०० प्रवासी रेल्वेच्या जाळ्यात अडकले. त्यातून पश्चिम रेल्वेला ३.३९ लाख रुपये दंड मिळाला. स्वच्छता मोहिमेबाबत रेल्वे बोर्डाच्या आदेशानंतर पश्चिम रेल्वेने चतु:सूत्री अमलात आणली आहे. त्यानुसार जनजागृती, सुविधा पुरवणे, उपाययोजना आणि दंड आकारलाजात आहे. पश्चिम रेल्वेवर दर दिवशी १०० ते १२५ प्रवाशांकडून दंड वसूल केला जातो. रेल्वे बोर्ड नियमानुसार दंड १०० ते ५०० रुपये एवढा आकारला जाऊ शकतो. यातील पहिल्या टप्प्यात १०० रुपये दंड जागेवरच आकारला जात आहे.