शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढणाऱ्यांना दंड

By admin | Updated: January 21, 2016 03:51 IST

सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढणाऱ्यांवर आता अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाई सुरू केली आहे. दोन दिवसांत राज्यातील सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या १ हजार २५७ जणांना दंड ठोठावला आहे.

मुंबई: सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढणाऱ्यांवर आता अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाई सुरू केली आहे. दोन दिवसांत राज्यातील सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या १ हजार २५७ जणांना दंड ठोठावला आहे. दोन दिवसांत एफडीएने सिगारेट आणि अन्यतंबाखूजन्य उत्पादने कायदा २००३ अंतर्गत १ हजार ५७३ व्यक्तींवर कारवाई करून २ लाख ४० हजार ७४० रुपयांचा दंड वसूल केला आहे. एफडीए आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या आदेशानुसार, गेल्या दोन दिवसांपासून राज्यात एफडीए अधिकाऱ्यांनी धडक कारवाई सुरू केली आहे. १८ आणि १९ जानेवारी या दोन दिवसांत शैक्षणिक संस्थांच्या १०० यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची, सिगारेटची विक्री करणाऱ्या ३१६ व्यक्तींकडून ५५ हजार ७५० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे, तर २९ हजार ४१८ रुपये किमतीचा सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. ‘शाळांजवळील टपऱ्या’ या विषयावर ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन करून हा विषय पुढे आणला होता. प्रशासनाचे आयुक्त डॉ. कांबळे यांनी सांगितले, ‘विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेऊन राज्यभरात कारवाई सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यभरात ही धडक कारवाई सुरू झाली आहे.’