शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल पालिकेची दंडात्मक कारवाई

By admin | Updated: January 18, 2017 03:10 IST

पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे यांनी नवीन पनवेल शहरात अतिक्रमण विरोधी मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे.

पनवेल : पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे यांनी नवीन पनवेल शहरात अतिक्रमण विरोधी मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. यापुढेही शहरात अशीच कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पनवेल, नवीन पनवेल, खांदा वसाहत, खारघर आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले होते. फुटपाथ, रस्ते, मोकळ्या जागा गिळंकृत करण्यात आल्या होत्या. काही दिवसांपूर्वी आयुक्तांनी पनवेल शहरातील अतिक्र मण काढण्यास सुरु वात केली होती. त्याचा धसका घेत नवीन पनवेल शहरातील काही फुटपाथ रिकामे झाले होते. मात्र कारवाईस काहींनी विरोध करण्यास सुरुवात केल्याने काही काळ ही कारवाई थंडावली. आता पुन्हा अतिक्रमण विरोधी मोहीम तीव्र करण्यात आली आहे. मंगळवार सकाळपासून आयुक्तांनी स्वत: उपस्थित राहून नवीन पनवेल येथील शिवा कॉम्प्लेक्स, अभ्युदय बँक परिसर, एचडीएफसी सर्कल, शबरी हॉटेल या भागात अतिक्र मण हटाव मोहीम सुरू केली. शहरातील अनेक गाळेधारकांनी दुकानाच्या नावाच्या पाट्या पुढे लावलेल्या आहेत. तसेच फुटपाथवरही अतिक्रमण केले आहे. मंगळवारी हे सर्व अतिक्रमण हटविण्यास सुरुवात झाली. काहींनी अतिक्रमण काढण्यास मुदत मागितली, मात्र त्यांचे न ऐकता आयुक्तांनी कारवाई सुरूच ठेवली आहे. शहरातील सेक्टर १ येथील महाराष्ट्र नंबर १ सेल, नवरत्न मेडिकल यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून प्रत्येकी ५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. आयुक्तांनी शहरात कारवाईला सुरु केल्याचे समजताच काहींनी स्वत:हून अतिक्र मण काढले. (वार्ताहर)>खारघरमध्ये आयुक्तांची कारवाईपनवेल पालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी रविवारी रात्री धडक कारवाई करत पदपथावरील फेरीवाल्यांना हटविले. यावेळी अतिक्र मण करून व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांकडून दोन लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आला. खारघर परिसरात फेरीवाल्यांनी आणि काही दुकानदारांनी पदपथावर ठाण मांडल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याचे आयुक्त सुधाकर शिंदे यांनी केलेल्या पाहणीत आढळले. रविवार रात्री आठ ते दहा दरम्यान बँक आॅफ इंडियाच्या परिसरात कारवाई केल्यानंतर सोमवारी सकाळी सेक्टर ३0 ओवा गाव परिसर, सेन्ट्रल पार्ककडून प्रणाम हॉटेलकडे जाणारा रस्ता तसेच सेक्टर २0, २१ मधील पदपथावर व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करून सामान जप्त करण्यात आले. डिसेंबर महिन्यात आयुक्तांनी रस्त्यालगतच्या गॅरेज व्यावसायिकांवर कारवाई करून हा रस्ता मोकळा केला होता. >गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमणधारकांनी जागा बळकावली होती. त्यामुळे पादचारी, वाहनचालकांची गैरसोय होत होती. शहरही विद्रूप झाले होते. या कारवाईमुळे फेरीवाले, दुकानदार, गाळेधारकांकडून नाराजी व्यक्त होत असली तरी नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. - डॉ. सुधाकर शिंदे, आयुक्त, पनवेल महापालिका