शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पेण अर्बनचे पुनरुज्जीवन शक्य

By admin | Updated: January 28, 2015 04:54 IST

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प (नयना) क्षेत्रात पेण अर्बन बँकेच्या कर्जांचा बोजा असणारी तब्बल दोन हजार गुंठे जमीन आहे.

जयंत धुळप, अलिबागनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प (नयना) क्षेत्रात पेण अर्बन बँकेच्या कर्जांचा बोजा असणारी तब्बल दोन हजार गुंठे जमीन आहे. त्या जमिनीचा मोबदला प्रति गुंठा एक कोटी या दराने पेण अर्बन बँकेस मिळाल्यास बँकेकडे २ हजार कोटी रुपये जमा होतील. त्यामुळे बँकेच्या विद्यमान ठेवीदारांचे ६३२ कोटी रुपये परत देऊन, बँकेचे पुनरुज्जीवन करणे सहज शक्य होईल, असा दावा ‘पेण अर्बन बँक ठेवीदार हक्क संघर्ष समिती’चे कार्याध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी केला. ते मंगळवारी पत्रकारांशी बोलत होते.नयना प्रकल्प क्षेत्रात सरदार बिवलकर यांची १५७ एकर जमीन आहे. ही जमीन विमानतळाकरिता संपादित करून सिडकोने आम्हाला पर्यायी जागेऐवजी पूर्ण आर्थिक मोबदलाच चालू जमीन बाजारभावाप्रमाणे द्यावा, अशी मागणी सरदार बिवलकर विरुद्ध सिडको या खटल्यात करण्यात आली होती. या जमिनीचा एकूण १५०० कोटी रुपयांचा मोबदला बिवलकर यांच्या वारसांना सिडकोने द्यावा, असा निवाडा मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच दिला. परिणामी नयना प्रकल्प क्षेत्रात एक गुंठा जमिनीचा बाजारभाव एक कोटी रुपये आहे, हे स्पष्ट झाले आहे. पेण अर्बन बँकेच्या कर्जबोजाच्या दोन हजार गुंठे जागेचे संपादन करून त्याचे दोन हजार कोटी बँकेस द्यावेत, अशी मागणी असल्याचे कार्याध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी सांगितले.बँकेच्या कर्जदारांकडून कर्ज वसुलीचा प्रक्रिया शासनाच्या माध्यमातून सुरू आहे. कर्जदार परतफेड करण्यात असमर्थ ठरल्यास त्याची वसुली जमीनदारांकडून करण्यात येणार असल्याने कर्जदार मोकळे सुटू शकत नाहीत, असे जाधव यांनी स्पष्ट केले. दरम्यान, बँकेच्या प्रशासक मंडळाने एकरकमी कर्ज परतफेड योजना अमलात आणली आहे. त्याकरिता कर्जदार व त्यांच्या जामीनदारांनी २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन केले आहे.