शहरं
Join us  
Trending Stories
1
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
2
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
3
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
4
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
5
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
6
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
7
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
8
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
9
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
10
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
11
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
12
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
13
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
14
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
15
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
16
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
17
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
18
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
19
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
20
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...

परिवहन अधिकाऱ्याच्या रिव्हॉल्व्हरमधून सुटली गोळी

By admin | Updated: November 17, 2015 01:23 IST

देवरी येथील आरटीओ चेकपोस्टवर परिवहन अधिकाऱ्याचे (आरटीओ) सर्व्हिस रिव्हॉल्वर खाली पडून त्यातून गोळी सुटली. ही गोळी एका ट्रक चालकाच्या जांघेत शिरल्याने,

गोंदिया : देवरी येथील आरटीओ चेकपोस्टवर परिवहन अधिकाऱ्याचे (आरटीओ) सर्व्हिस रिव्हॉल्वर खाली पडून त्यातून गोळी सुटली. ही गोळी एका ट्रक चालकाच्या जांघेत शिरल्याने, त्याला येथील केटीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती धोक्यावर बाहेर आहे.ट्रकमध्ये केळी भरून मोहम्मद साबीर खान (३६) हा भुसावळवरून ओडिसाकडे जात होता. देवरी येथील आरटीओ चेकपोस्टवर तो शनिवारी सायंकाळी ७.३०च्या सुमारास पोहोचला. आपले परमिट दाखवत असताना, आरटीओ नितीन उईके यांनी टेबलावर ठेवलेले सर्व्हिस रिव्हॉल्वर खाली पडले व त्यातून गोळी सुटली. ही गोळी टेबलसमोर उभ्या असलेल्या साबीर खान याच्या उजव्या पायाच्या जांघेतून निघून डाव्या पायाच्या जांघेत शिरली. उईके यांनी लगेच त्यांना आपल्या गाडीत टाकून उपचारासाठी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात रात्री ९ वाजतादरम्यान दाखल केले.सद्यस्थितीत देवरी पोलिसांनी या घटनेची नोंद केलेली नाही. या प्रकरणी देवरीचे पोलीस उपनिरीक्षक शेलके म्हणाले की, ‘ट्रकचालक पोलिसांत तक्रार नोंद करू इच्छित नाही. तो याला अचानक घडलेली घटना समजत आहे. तथापि, यात जर काही दोष आढळेल, तर निश्चितच प्रकरणाची नोंद केली जाईल.’ (प्रतिनिधी)