शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
3
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
4
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
5
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
6
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
7
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
8
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
9
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
10
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
11
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
12
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
13
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
14
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
15
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
16
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
17
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
18
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
19
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
20
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन

पेहरन-ए-शरीफ उत्सवाची जय्यत तयारी , १०० वर्षांची परंपरा

By admin | Updated: October 15, 2016 17:51 IST

राज्यात केवळ यावल येथेच साजरा होत असलेला ‘पेहरन-ए-शरीफ’ उत्सव १६ आॅक्टोबर रोजी येथे आयोजीत केला आहे. या उत्सवास सुमारे १०० वर्षांची परंपरा आहे

ऑनलाइन लोकमतयावल, दि. १५ -  राज्यात केवळ यावल येथेच साजरा होत असलेला ‘पेहरन-ए-शरीफ’ उत्सव १६ आॅक्टोबर रोजी येथे आयोजीत केला आहे. या उत्सवास सुमारे १०० वर्षांची परंपरा आहे. उर्दू वर्षानुसार दरवर्षी मोहरमच्या १४ तारखेस उत्सव साजरा होतो. उत्सवासाठी राज्यासह परराज्यातील मुस्लीम बांधव आपल्या नातलगाकडे हजेरी लावतात. त्यामुळे शहराला यात्रेचे स्वरूप येते.यावर्षी उत्सवाचे आयोजन बाबुजीपुरा उत्सव समीतीने केले आहे. जस्र पेहरन शरीफ उत्सवामागील हकिकत अशी की, येथील नजमोद्दीन अमीरोद्दीन यांनी बगदाद येथील सय्यदना गौसे आजम दस्तगीर यांचे पेहरन आणले होते. त्यास तब्बरूक (पवित्र वस्त्र)असे म्हणतात. याच पवित्र वस्त्राची सजविलेल्या डोलीतून वाद्यवृंदाच्या गजरात धार्मिक गीत गात मिरवणूक काढली जाते. हिंदू-मुस्लीम बांधव उत्सवात सहभागी होत असल्याने एकात्मतेचे दर्शन घडते. मिरवणूकीदरम्यान पेहरन-ए-शरीफच्या डोलीखालून निघतांना भाविक मन्नत (मागणे) मागतात. ती हमखास पूर्ण होते अशी हिंदू-मुस्लीम भाविकांची श्रध्दा आहे.या निमित्त संपूर्ण शहर हिरव्या पताकांनी सजविण्यात आले. दुकानांवर रोषणाई करण्यात आली आहे. समिती अध्यक्षपदी मोहम्मद हकिम मोहम्मद याकूब, उमरखान परवेजखान मोहसीनखान. सचिवपदी अयुबखान फजलू रहेमानखान, यांच्यासह विश्वस्थ आहेत. विविध पंच कमिटी नियुक्त करण्यात आली. उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी होणारी कुस्त्यांची आमदंगल या वर्षीही हडकाई नदीपात्रात दुपारी होईल. कुस्ती लढण्यासाठी बऱ्हाणपूर, मालेगाव, चाळीसगाव, पाचोरा, धुळ्यास जिल्हयातील मल्ल येथे हजेरी लावतात.