शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्ज वाटपात पश्‍चिम विदर्भ माघारला

By admin | Updated: September 5, 2014 01:46 IST

लक्षांकाच्या तुलनेत ८७ टक्केच कर्ज वाटप

अकोला : अनियमीत पावसामुळे शेतकर्‍यांना खरीप पीक कर्जाची निंतात गरज असली तरी, राष्ट्रीयकृत बँकांच्या जाचक अटींमुळे पश्‍चिम विदर्भाला पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट अद्याप गाठता आले नाही. असे असले तरी, मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पुढाकाराने पीक कर्जाचा हा आकडा यंदा तीन हजार पाचशे २९ कोटी ७३ लाख ४२ हजारापर्यंत पोहोचला आहे.पश्‍चिम विदर्भातील जवळपास ५ लाख २१ हजार ८६२ शेतकर्‍यांनी यंदा पीक कर्ज घेतले आहे. हे सर्व कर्ज पश्‍चिम विदर्भातील अकोला, यवतमाळ आणि अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी उपलब्ध करू न दिले आहे. बुलडाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सध्या डबघाईस आलेली असल्याने, या जिल्हयातील शेतकर्‍यांना पीक कर्जासाठी राष्ट्रीयकृत बँकांवरच अवलंबून राहावे लागले. त्यामुळे या जिल्हय़ातील २ लाख ३७ हजार ८0१ शेतकर्‍यांना २८ ऑगस्टपर्यंत १४८१ कोटी ९५ लाख ४२ हजाराचे कर्ज वाटप झाले आहे. हे कर्जवाटप एकूण उद्दीष्टाच्या ८७ टक्के असून, उद्दीष्टपूर्तीसाठी आणखी १३ टक्के कर्ज वाटप होणे आवश्यक आहे. पश्‍चिम विदर्भातील शेतकर्‍यांना राष्ट्रीयकृत बँकांनी ३१ जूलैपर्यंत २८६ कोटी १६ लाखाचे खरीप पीक कर्ज वाटप केले आहे. विदर्भ - कोंकण ग्रामीण बॅकांचा यामध्ये ७६ कोटी ९५ लाखाचा वाटा असून, व्यावसायिक अर्थात व्यापारी बँकांनी यामध्ये ७ टक्के कर्ज वाटप केले आहे. त्यांच्या कर्जवाटपाचा आकडा हा ६९ कोटी ८७ लाखापर्यंतचा आहे. पीक कर्ज वाटपाची मुदत यंदा येत्या ३0 सप्टेंबरपर्यंत असल्याने पश्‍चिम विदर्भाला देण्यात आलेले पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट पूर्ण होईल, अशी अ पेक्षा विभागीय सहनिंबधक संगिता डोंगरे यांनी व्यक्त केली. ** अकोला जिल्हा मध्यवर्तीचे लक्षांक अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेने यंदा खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट पूर्ण केले आहे. यंदा ३७२ कोटी ११ लाख ३0 हजाराचे उद्दीष्ट होते. या बँकेने यंदा ३५६ कोटी २५ लाख म्हणजचे १0४.४५ टक्के पीक कर्जवाटप केले आहे. हे कर्ज ६६ हजार २५७ शेतकर्‍यांनी घेतले आहे.** कर्ज वाटप स्थिरावले ८५ टक्क्यांवर !गतवर्षी जवळपास ९५ टक्क्यांपेक्षा जास्त खरीप पीक कर्जवाटपाचे उद्दीष्ट पूर्ण झाले होते. यंदा मात्र पीक कर्जाचा हा आकडा ८५ टक्क्यांच्या जवळपास स्थिरावला आहे. हे उद्दीष्ट पूर्ण होण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकानी लवचिक भूमिका घेणे गरजेचे आहे.