शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
4
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
5
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
6
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
7
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
10
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
11
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
12
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
13
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
14
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
19
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
20
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!

अभयारण्यात चंदनाच्या लाकडांवर शिजवले मोराचे मांस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 23:36 IST

लोणार येथे वन्यजीव अभायारण्यात मोराची शिकार करुन अभयारण्यातीलच चंदनाचे झाडे तोडल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला आहे.

किशोर मापारी/ ऑनलाइन लोकमत
लोणार, दि. 18 - वन्यजीव अभायारण्यात भरदिवसा राष्ट्रीय पक्षी मोराची शिकार करुन अभयारण्यातीलच चंदनाचे झाडे तोडल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला आहे.  चंदनाच्या लाकडांवर मोराचे मांस शिजवून मेजवानी केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे.  
 
सरोवराच्या काठावरच मोराचे मांस शिजवून खाल्याचे निदर्शनास येत असल्यामुळे वनविभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. याबाबत वनप्रेमीकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. 
 
 न्यजीव अभयारण्यात वनविभागाकडून अनेक दक्षता घेण्याच्या सूचना वरिष्ठ अधिका-यांकडून वारंवार देण्यात येत असतात. मात्र स्थानिक वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी हे या अभायारण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. लोणार अभयारण्यात अनेक पक्षी आहे.  यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय पक्षी मोर यांची संख्या जास्त आहे मात्र दिवसेंदिवस या राष्ट्रीय पक्षाची होत असलेली शिकार पाहता लोणार अभयारण्यामध्ये मोरांची संख्या कमी होत आहे. 
 
आतातर भरदिवसा लोणार अभयारण्यात मोराची शिकार होत असल्याचे भयावहक चित्र 17 जुलै रोजी समोर आले. 17 जुलै रोजी सकाळी अभयारण्याभोवती अनेक नागरिक फेरी मारत असतात.  सरोवराच्या काठावर बसले असताना या नागरिकांना अभयारण्यातच किन्ही रोडपासून अवघ्या काही अंतरावर सरोवराच्या काठावर दोन चुल आढळुन आल्या.  एवढेच नव्हे तर या ठिकाणी कागदाच्या पत्रावाळ्या त्यावर मांस  आढळून आले ही बातमी वा-यासारखी शहरात पसरताच वन्यप्रेमीनी या ठिकाणी जाउन पाहणी केली असता अक्षरशः या ठिकाणी चंदनाच्या लाकडावर  मोराचे मांस शिजवून मेजवानी घेतल्याचे आढळले.
 याबाबत वन्यप्रेमीनी वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांना याबाबतच्या सूचना दिल्या.  मात्र तब्बल चार तासानंतर वनविभागाचे कर्मचारी या ठिकाणी पोहोचले मात्र प्रत्यक्षात जाणकारांनी यावेळी सांगितले की सदर मांस हे मोराचे आहे. या घटनेमुळे वन्यप्रेमीमध्ये नाराजीचा सूर उमटत असून वनविभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे .
 
 
लोणार वन्यजीव अभयारण्याचा नियमांची होत आहे पायमल्ली 
ज्या ठिकाणी वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केलेले आहे त्या ठिकाणी अनेक नियम शासनाने लावण्यात आलेले आहे. दिवस निघाल्यापासून ते सूर्यास्तपर्यंत वन्यजीव अभयारण्यात जाणा-या येणा-याची नोंद ठेवणे बंधनकारक आहे.  तसेच वन्यजीव अभयारण्यात कोणीही अग्निजन्य वस्तू नेण्यास बंदी आहे, असे असतानाही लोणार अभयारण्यात सररासपणे कुणीही वावरत असून यावर वनविभागाचा अंकुश नाही.
 
लोणार अभयारण्याच्या काठावर अज्ञात सात ते आठ जणांनी मोर या पक्षाची शिकार करून या मोराचे मास सरोवराच्या काढावरच शिजवण्यात आलं. ही घटना 16 जुलै रोजी सांयकाळी घडली असल्याचे बोलले जात आहे. 16 जुलैच्या रात्री 9 वाजल्यापासून पाऊस असल्यामुळे हे कृत्य 16 जुलै रोजी सांयकाळी 6 ते 8 वाजण्याच्या दरम्यान घडले असल्याची चर्चा आहे. यामध्ये वनविभागाचे कर्मचारीसुद्धा सहभागी असल्याची चर्चा आहे.