शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

‘पीसीपीएनडीटी’च्या दक्षता विभागाने फोडले गोठीचे बिंग!

By admin | Updated: March 3, 2017 00:27 IST

गोपनीय माहितीवरुन पीसीपीएनडीटीच्या अकोला येथील दक्षता विभागाने २३ फेब्रुवारीला सापळा रचला असता, डॉ. सरला गोठी (डी.एच.एम.एस.) यांना सोनोग्राफी करताना रंगेहात पकडण्यात आले.

नांदुरा : शहरातील डॉ.राजेंद्र गोठी सोनोग्राफी केंद्र येथे अनधिकृत सोनोग्राफी व वैद्यकीय गर्भपात होतात, अशा गोपनीय माहितीवरुन पीसीपीएनडीटीच्या अकोला येथील दक्षता विभागाने २३ फेब्रुवारीला सापळा रचला असता, डॉ. सरला गोठी (डी.एच.एम.एस.) यांना सोनोग्राफी करताना रंगेहात पकडण्यात आले. यावरून तपासणीस आलेल्या पथकाने सोनोग्राफी मशीन सील केली. मात्र, एवढा मोठा गैरप्रकार शहराच्या हृदयस्थानी असलेल्या चौकात सुरू असताना अकोला विभागाने कारवाई केल्याने स्थानिक अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हाधिकारी व लेक वाचवा अभियानाचा गवगवा करणारे समाजसेवी झोपले होते काय? किंबहुना त्यांची मूकसंमती या प्रकाराला होती काय? असा प्रश्न जनमानसात आता चर्चिल्या जात आहे.जिल्ह्यातील स्थानिक अधिकारी व आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांना प्रत्येक रुग्णालयातील चालणाऱ्या गैरकारभाराची माहिती असतेच मात्र, आपल्या कर्तव्यानुसार प्रामाणिकपणे कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची कमी किंवा स्वत:चे हात शेकून घेण्याची वृत्ती वाढीस लागल्याने नांदुरा शहरातील सोनोग्राफी सेंटरमध्ये पात्रता नसताना सोनोग्राफी करणाऱ्यांना अकोला येथील पीसीपीएनडीटी पथकाला धाव घेऊन सापळा रचून कारवाई करावी लागली. यामुळे जिल्ह्यातील स्थानिक अधिकारी काय करीत होते? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पीसीपीएनडीटी विभागाने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये एका गर्भवती महिलेला सोनोग्राफीसाठी डॉ.राजेंद्र गोठी यांच्या सोनोग्राफी सेंटरमध्ये पाठविले असता त्यांच्या पत्नी डॉ. सरला गोठी यांनी शैक्षणिक पात्रता व कोणताही परवाना नसताना सदर महिलेची सोनोग्राफी केली. तसेच या सोनोग्राफी केंद्रातून मागील दोन दिवसांपासून आॅनलाइन एम फॉर्म व आॅफलाइन एम फार्म भरले जात नसल्याचे संबंधित पथकाच्या निदर्शनास आले. तसेच वैद्यकीय गर्भपात कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. लायन्स ज्ञानगंगा ह्या शहरातील सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून डॉ.राजेंद्र गोठी समाजसेवेत कार्यरत आहेत. त्यांच्या हॉस्पिटलमधील या धडक कारवाईमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. याचप्रमाणे इतर सर्व सोनोग्राफी सेंटरची नियमित तपासणी होणे गरजेचे आहे. ----------‘लेक वाचवा’च्या जिल्ह्यातील गैरप्रकार!बुलडाणा जिल्ह्यातील ‘लेक वाचवा’ या अभियानाचे सर्वत्र कौतुक झाले. याच जिल्ह्यात पतीचे सोनोग्राफी सेंटर शैक्षणिक पात्रता व परवाना नसलेल्या पत्नीकडून चालविल्या जात असल्याचे तसेच येथे अनधिकृत सोनोग्राफी व वैद्यकीय गर्भपात होतात, अशी दक्षता पथकाला मिळालेली गोपनीय माहिती हे ‘लेक वाचवा’ चा गजर देणाऱ्या जिल्ह्यात शोभनीय नाही. शाळा-महाविद्यालयातील चिमुकले ‘लेक वाचवा’चा नारा देत असताना जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष का? असा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये उपस्थित होत आहे.----------सोनोग्राफी केंद्रात कोणत्याही प्रकारचे नियमबाह्य कृत्य केले जात नाही. या केंद्राला शासनमान्यता असून, आपण मोठ्या षड्यंत्राचा शिकार बनलो आहोत. सत्य लवकरच बाहेर येईल.- डॉ. राजेंद्र गोठी, संचालक, डॉ. गोठी सोनोग्राफी केंद्र, नांदुरा.