शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पीसीएम गटात विजय, स्मितची बाजी

By admin | Updated: June 4, 2017 01:34 IST

तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या सामाईक परीक्षेचा निकाल, शनिवारी सायंकाळी ५ वाजता संकेतस्थळावर

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या सामाईक परीक्षेचा निकाल, शनिवारी सायंकाळी ५ वाजता संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. पीसीएम (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स) गटात २०० पैकी १९७ गुण मिळवून मुंबईच्या स्मित रामभिया आणि सोलापूरच्या विजय मुंद्रा यांनी बाजी मारली आहे. पीसीबी (फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी) गटात २०० पैकी १९० गुण मिळवत, अमेय माचवे याने प्रथम क्रमांक पटकवला आहे. अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांसाठी राज्य सामाईक प्रवेश प्रक्रिया घेण्यात आली होती. शनिवारी सायंकाळी http://www.dtemaharashtra.gov.in/mhcet2017 या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. या परीक्षेसाठी एकूण ३ लाख ८९ हजार ५२० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या परीक्षेला १ लाख ८५ हजार ९६३ मुले आणि ९८ हजार २७६ मुली पीसीएम गटासाठी परीक्षेला बसल्या होत्या, तर १ लाख २२ हजार ३११ मुले आणि १ लाख १६ हजार ५४ मुली पीसीबी गटासाठी परीक्षेस बसले होते. या परीक्षेत २३ हजार ७८ विद्यार्थ्यांनी पीसीएम गटात, तर १२ हजार ७१२ विद्यार्थ्यांनी पीसीबी गटात १०० अथवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. पीसीएम गटातील २ हजार ८८९ विद्यार्थ्यांनी, तर पीसीबी गटात ५७३ विद्यार्थ्यांनी १५० पेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. मागासवर्गीय उमेदवारात पीसीएम गटात हृषिकेश पवार याने २०० पैकी १९० गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकवला आहे, तर पीसीबी गटात गौरव कचोळे याने २०० पैकी १८७ गुण मिळवत पहिला क्रमांक पटकवला आहे.