शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पैसे द्या, मगच हात लावा म्हणताच त्यांनी केला तृतीयपंथीचा खून

By admin | Updated: June 28, 2016 20:34 IST

गतवर्षी मे महिन्यात भागंसी माता गडाच्या पायथ्याशी संध्या सखी (३५) या तृतीयपंथीचा निघृण खून झाला होता. तब्बल एक वर्षानंतर या खुनाचे गूढ उकलण्यात गुन्हे शाखा पोलिसांना यश आले.

खुनाचे गूढ उकलले: दोघांना अटक

औरंगाबाद : गतवर्षी मे महिन्यात भागंसी माता गडाच्या पायथ्याशी संध्या सखी (३५) या तृतीयपंथीचा निघृण खून झाला होता. तब्बल एक वर्षानंतर या खुनाचे गूढ उकलण्यात गुन्हे शाखा पोलिसांना यश आले. दारूच्या नशेत असलेले दोन तरुण अनैसर्गिक संभोग करण्यासाठी या तृतीयपंथ्याला डोंगराच्या पायथ्याशी घेऊन गेले. तेथे आधी पैसे द्या, मगच संभोग करा असे म्हणत तृतीयपंथीने अंगाला हात लावण्यास विरोध केला. या तरुणांकडे तर पैसेच नव्हते. त्यामुळे रागाच्या भरात दोन्ही तरुणांनी या तृतीयपंथीचा खून केला होता, असे तपासात समोर आले. खून करणाऱ्या रामकृष्ण ऊर्फ पिंट्या अश्वथामा त्रिपाठी (३५, रा. वडगाव कोल्हाटी) आणि एकनाथ शिवाजी आहेर (२६, रा जयभवानी चौक, बजाजनगर) या दोन्ही आरोपींना गुन्हेशाखा पोलिसांनी अटक केली.घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, २२ मे २०१५ रोजी भांगसी माता गडाच्या पायथ्यांशी संध्या या तृतीयपंथीचे प्रेत आढळून आले होते. त्याचा अत्यंत निघृण खून करण्यात आलेला होता. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी बरेच प्रयत्न केले. पोलिसांनी आपले खबरे कामाला लावले. विविध अंगांनी या गुन्ह्याचा तपास केला; परंतु काहीही हाती लागले नाही. शेवटी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी हतबळ होऊन तपास थंड बस्त्यात टाकून दिला होता.

आयुक्तांनाच मिळाली खबरपोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही गेल्या वर्षभराच्या कालावधीत औरंगाबादेत आपले स्वत:च्या खबऱ्यांचे एक वेगळे नेटवर्क उभारलेले आहे. आयुक्तांचे हेच नेटवर्क संध्याच्या खुनाचे गूढ उकलण्यासाठी कामी आले. आयुक्तांच्या एका खबऱ्याने चार दिवसांपूर्वी थेट आयुक्तांनाच संपर्क साधून संध्याच्या खुनामागे वडगाव कोल्हाटी परिसरातील रामकृष्ण त्रिपाठी उर्फ पिंट्याचा हात आहे, अशी खबर दिली. लागलीच आयुक्तांनी गुन्हे शाखेला कामाला लावले. लगेच गुन्हे शाखा पोलिसांनी शोध घेऊन चार दिवसांपूर्वी पिंट्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली; परंतु त्याने काही तोंड उघडले नाही. आपल्याला काही माहीत नाही, असेच तो सांगत होता. शेवटी चौकशीअंती त्याला सोडून देण्यात आले. मात्र, हाच आरोपी आहे, याची आयुक्त आणि गुन्हे शाखेला खात्री होती. त्यामुळे त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली.

म्हणे पोलिसांना वेड्यात काढलेपोलिसांच्या तावडीतून सुटल्यानंतर पिंट्या त्रिपाठी दारूच्या गुथ्यावर गेला. आपल्या साथिदारांसोबत त्याने मनसोक्त दारू ढोसली आणि नशेत बोलता बोलता मी तर पोलिसांना वेड्यात काढून आलोह्ण असे तो बोलून गेला. ही बाब पाळतीवर असलेल्या खबऱ्याने लगेच पोलिसांना सांगिलते. मग काल अखेर गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती, निरीक्षक मधुकर सावंत, फौजदार बागूल, जमादार नितीन मोरे विलास वाघ व त्यांच्या सहकाऱ्यांनी पिंट्याला उचलले. त्याला खाक्या दाखवून विचारपूस सुरू करताच अखेर त्याने तोंड उघडले. साथिदार एकनाथ आहेर याच्या मदतीने तृतीयपंथी संध्याचा खून केल्याची त्याचे स्पष्ट कबुली दिली. लगेच त्याच्या कबुलीनंतर पोलिसांनी एकनाथलाही अटक केली.

पैशांची मागणी केल्याने खूनआरोपी पिंट्या आणि एकनाथ हे खाजगी कंपनीत नोकरी करतात. दोघे चांगले मित्र आहेत. सोबत सतत ते दारू पितात. त्या दिवशी दोघांनी दारू ढोसली होती. घरी जात असताना त्यांना कोलगेट कंपनीसमोर तृतीयपंथी संध्या नजरेस पडला. मग त्यांनी संध्यासोबत अनैसर्गिक संबधाची बोलणी केली. नंतर त्याला घेऊन ते भांगसी माता गडाच्या पायथ्याशी आले. तेथे आधी पैसे द्या, त्याशिवाय अंगाला हात लावू देणार नाही असे तृतीयपंथी म्हणाला. या दोघांकडे पैसे नव्हते. पैशाशिवाय तो हात लावू देईना. त्यातून त्यांच्यात वाद झाला आणि मग रागाच्या भरात नशेत असलेल्या पिंट्या आणि एकनाथने या तृतीयपंथ्याचा खून केला, असे तपासात समोर आल्याचे पोलीस निरीक्षक सावंत यांनी सांगितले.