शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

पीठगिरणी चालकास दोन लाखांची भरपाई

By admin | Updated: August 14, 2015 01:00 IST

शेजारी उभे राहात असलेले चार मजली अनधिकृत बांधकाम निष्काळजीपणाने पाडल्याने त्याचे काँक्रिटचे मोठे तुकडे पडून मोडतोड झालेली ठाकुर्ली येथील एक पिठाची गिरणी पुन्हा पूर्वी होती तशी

मुंबई: शेजारी उभे राहात असलेले चार मजली अनधिकृत बांधकाम निष्काळजीपणाने पाडल्याने त्याचे काँक्रिटचे मोठे तुकडे पडून मोडतोड झालेली ठाकुर्ली येथील एक पिठाची गिरणी पुन्हा पूर्वी होती तशी बांधून द्यावी तसेच त्या गिरणीमालकास दोन लाख रुपये भरपाई द्यावी, असा आदेश देऊन मुंबई उच्च न्यायालयाने कल्याण-डोंबिवली महापालिकेस दणका दिला आहे.२८ आॅगस्ट २०१२ रोजी अशा प्रकारे गिरणीची मोडतोड झाल्यापासून गिरणीमालक मेवालाल हिरालाल शहा यांचे चरितार्थाचे साधन बंद झाले आहे. त्यामुळे महापालिकेने शहा यांना त्या दिवसापासून गिरणी नव्याने बांधून देईपर्यंत दरमहा बुडालेल्या उत्पन्नापोटी पाच हजार रुपये द्यावेत, असा आदेशही न्या. अभय ओक आणि न्या. सी.व्ही भडंग यांच्या खंडपीठाने दिला. यानुसार आतापर्यंतची रक्कम दोन महिन्यांत द्यावी व यापुढील रक्कम दरमहा १० तारखेच्या आत दिली जावी, असेही न्यायालयाने सांगितले.एवढेच नव्हे तर मेवालाल शहा यांना दाव्याच्या खर्चापोटीही महापालिकेने ५० हजार रुपये द्यायचे आहेत. पाडकामाची कारवाई निष्काळजीपणे करण्यास कोण जबाबदार आहे हे ठरवून महापालिका आता भरपाई म्हणून द्यावी लागत असलेली रक्कम त्या अधिकाऱ्याकडून वसूल करू शकेल, अशी मुभाही न्यायालयाने दिली. तसेच याहून अधिक भरपाई मिळण्यासाठी शहा महापालिकेविरुद्ध स्वतंत्रपणे दिवाणी दावाही दाखल करू शकतील, असेही खंडपीठाने नमूद केले.ठाकुर्ली फ्लोअर मिल म्हणून ओळखली जाणारी ही पीठगिरणी ठाकुर्ली रेल्वे स्टेशनच्या जवळ १९७०पासून सुरु होती. जागामालक सप्रा कुटुंबाने आर. बिल्डरला काम देऊन या गिरणीला लागूनच एक चार मजली अनधिकृत इमारत बांधायला घेतली. पिलर व स्लॅबचे आरसीसी काम झाल्यावर महापालिकेने ते बेकायदा बांधकाम पाडले. परंतु हे काम करताना योग्य ती काळजी न घेतल्याने पाडलेला स्लॅब गिरणीवर पडून तिची मोडतोड झाली होती. यानंतर जागामालकाने तेथे नवे बांधकाम करून तो गाळा तिसऱ्यालाच भाड्याने दिला होता. गिरणीच्या जागेवर केलेले हे नवे बांधकाम बेकायदा असल्याने महापालिकेने ते आधी पाडावे व त्याजागी पुन्हा होती तशी गिरणी बांधून द्यावी, असे न्यायालयाने सांगितले.या सुनावणीत गिरणीमालक शहा यांच्यासाठी अ‍ॅड. माधव जामदार यांनी, महापालिकेसाठी अ‍ॅड. ए.एस.राव यांनी, जागामालकांसाठी अ‍ॅड. संजय घैसास यांनी तर राज्य सरकारसाठी सहाय्यक सरकारी वकील मोलिना ठाकूर यांनी काम पाहिले. (विशेष प्रतिनिधी)