शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
3
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
4
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
5
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
6
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
7
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
8
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
10
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
11
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
12
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
14
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
15
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
16
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
17
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
18
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
19
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
20
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल

पवनीत गोळीबार; तरुण ठार

By admin | Updated: July 17, 2014 01:10 IST

जुन्या वादातून देवलापार येथील तरुणाची पवनी येथे गोळीबार करून हत्या केली. ही घटना बुधवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनंतर संतप्त जमावाने राष्ट्रीय महामार्गावर

पोलीस व्हॅनसह १२ वाहने पेटविली : जमावाचा रोष; आरोपीच्या नातेवाईकाचे घरही पेटविलेदेवलापार : जुन्या वादातून देवलापार येथील तरुणाची पवनी येथे गोळीबार करून हत्या केली. ही घटना बुधवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनंतर संतप्त जमावाने राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको केला, आरोपीचे घर जाळले. आरोपीच्या दोन ट्रकसह इतर वाहनांचीही जाळपोळ केली. एवढेच नव्हे संतप्त जमावाने पोलिसांची व्हॅनही पेटविली. त्यानंतर देवलापार पोलीस ठाण्यावर जमाव चालून गेला. पोलीस ठाणे जाळण्याच्या प्रयत्नात असताना राज्य राखीव दलाने लाठीमार केला. यामुळे प्रचंड तणावाचे वातावरण तयार झाले होते. धनेश बन्सीधर गुप्ता (२७, रा. देवलापार) असे मृताचे तर स्मित गुप्ता असे जखमीचे नाव आहे. जयसिंग यादवसह आठ ते दहा जणांचा आरोपीमध्ये समावेश आहे. धनेश हा ठेकेदार होता. त्याचे पवनी येथे कार्यालय असून लहान भाऊ स्मित याचे मोबाईलचे दुकान आहे. दुपारच्या वेळी दोघेही दुकानात होते. दरम्यान ८ ते १० जण दुकानासमोर आले. त्यांनी समोरील काचा फोडून देशी कट्ट्यातून धनेशच्या छातीवर तीन गोळ्या झाडल्या. त्याला वाचविण्यासाठी स्मित धावला असता त्याला जबर मारहाण केली. यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला. गोळीबारानंतर धनेश जागीच कोसळला. नागरिकांनी त्याला लगेच देवलापार येथील रुग्णालयात आणले. तेथून नागपूरला हलविले. मात्र त्याचा मृत्यू झाला. जखमी स्मितवर सध्या उपचार सुरू आहे. घटनेची माहिती नागरिकांना मिळताच पवनी आणि देवलापार येथे रास्तारोको केला. पोलीस सूत्रानुसार, देवलापार येथील बाजारात मंगळवारी धनेशला मारहाण झाली. याबाबत धनेशने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. यानंतर दुसऱ्या गटानेही पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याबाबत विचारणा करण्यासाठी आरोपी हे आज, बुधवारी पोलीस ठाण्यात गेले. तेथून पवनी येथे दुकानात जाऊन गोळीबार केला. त्यात धनेशचा मृत्यू झाला तर स्मित जखमी झाला. या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी आरोपीचा नातेवाईक इंदल यादव याचे चोरबाहुली येथील घर पेटविले. यासोबतच एमएच-४०/वाय-७८१८, एमएच-४०/वाय-७७१८ क्रमांकाचे ट्रक, एमएच-४०/पी-७०७ क्रमांकाचा जेसीबी, एमएच-३१/२९८१ क्रमांकाच्या कारसह आणखी एक कार, दोन ट्रॅक्टरची जाळपोळ केली. जमावाची आक्रमकता पाहून देवलापारसह रामटेक, कामठी, कन्हान, खापरखेडा, पारशिवनी, खापा येथून पोलिसांसह राज्य राखीव दलाला पाचारण करण्यात आले. दरम्यान, जमावाने पोलिसांची दोन वाहने पेटविली. सध्या देवलापार येथे पोलीस उपमहानिरीक्षक रवींद्र कदम, प्रभारी पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दीपक साळुंखे यांच्यासह पोलिसांची मोठी कुमक तैनात आहे. चोरबाहुली, पवनी आणि देवलापार येथे तणापूर्ण शांतता आहे. (वार्ताहर)