शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानपदाच्या 'त्या' विधानावर पवारांचा यू-टर्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 10:34 IST

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पेडर रोडवरील मतदान केंद्रात जाऊन मतदान केलं आहे.

मुंबईः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पेडर रोडवरील मतदान केंद्रात जाऊन मतदान केलं आहे. मतदानानंतर मोदींनी काल केलेल्या पंतप्रधानपदाच्या विधानावर भाष्य केलं आहे. त्यावेळी पवारांनी राहुल गांधींऐवजी पंतप्रधानपदासाठी ममता, मायावती आणि चंद्राबाबूंची नावं पुढे केली होती. त्याच विधानावर पवारांनी आता यू-टर्न घेतला आहे. अशी बातमी छापणं म्हणजे एक प्रकारचा खोडसाळपणाच आहे. फक्त टीआरपीसाठी अशी बातमी छापून आणल्याचा आरोपही पवारांनी प्रसारमाध्यमांवर केला आहे.पवार म्हणाले, आजचा दिवस देशासाठी महत्त्वाचा असून, देशात स्थिर सरकार येणं गरजेचं आहे. मुंबईतल्या मतदानाच्या टक्केवारीबाबत काळजी वाटत असली तरी मुंबईकर उत्साहानं मतदानाचा हक्क बजावतील. माझ्यासाठी मावळ काय, बारातमी काय आणि मुंबई काय सगळ्याच निवडणुका महत्त्वाच्या आहेत. मतदान करण्याची संधी मला मिळाल्यानं मी आनंदी आहे, सुट्ट्या आहेत लोक बाहेर गेले आहेत असं म्हणतात. पण मला असं वाटतं मुंबईकर मतदानात मागे राहणार नाहीत. यंदा लोक निर्णायक निर्णय घेतली, असंही पवार म्हणाले आहेत. 

काल पवारांनी एका टीव्ही चॅनेलनं दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधानपदावर भाष्य केलं होतं. पवारांनी पंतप्रधानपदासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि बसपा अध्यक्ष मायावती यांच्या नावांना समर्थन दिलं होतं. जर राष्ट्रीय लोकशाही आघाडी(NDA)ला लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळालं नाही आणि विरोधकांचं सरकार आल्यास हे तीन नेते पंतप्रधानपदाचे दावेदार असू शकतात. या तिन्ही नेत्यांना प्रशासकीय कामांचा दांडगा अनुभव असल्याचाही उल्लेख पवारांनी केला होता.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019