शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांमुळे पवार ‘वेटींग’वर

By admin | Updated: January 10, 2016 03:44 IST

डॉ.आप्पासाहेब पवार पुरस्कार वितरण सोहळ्याला पोहोचण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तब्बल दीड तास विलंब झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रतीक्षा करावी लागली.

दीड तास विलंब : मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली दिलगिरीजळगाव : डॉ.आप्पासाहेब पवार पुरस्कार वितरण सोहळ्याला पोहोचण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तब्बल दीड तास विलंब झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रतीक्षा करावी लागली. मुख्यमंत्र्यांनी भाषणाच्या सुरुवातीला शरद पवार आणि उपस्थितांची दिलगिरी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जळगाव दौऱ्यात आधी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयाचे उद्घाटन, नंतर महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन हे कार्यक्रम आटोपून दुपारी १.४५ वाजता जैन हिल्स येथील पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी उपस्थित राहणार होते. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील उस्मानिया पार्क येथील कार्यक्रम आटोपून जैन हिल्स येथील कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. त्यानुसार पवार हे दुपारी १२ वाजता जैन हिल्स येथे पोहोचले. तेथील गुरूकुल हॉलमध्ये राष्ट्रवादीच्या आजीमाजी आमदार व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या सत्कार सोहळा व मेळाव्यास उपस्थित राहिले. तो मेळावा आटोपून ते पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमास्थळी १.४५ वाजता आले. व्यासपीठाच्या मागील बाजूस असलेल्या खोलीत ते थांबले. त्यांच्यासमवेत जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन, कविवर्य ना.धों. महानोर उपस्थित होते. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांना आणखी अर्धा तास विलंब होणार असल्याची घोषणा सूत्रसंचालकांनी केली. आणि कार्यक्रमादरम्यान दाखविण्यात येणार असलेल्या चित्रफिती आता दाखविण्यात येत असल्याचे सूत्रसंचालकाने सांगितले. ते ऐकून शरद पवार हे जैन व महानोर यांच्यासह व्यासपीठावर आले. मी चित्रफिती पाहण्यासाठी व्यासपीठावर आलो हे आवर्जून सूत्रसंचालक डॉ.के.बी.पाटील यांना सांगितले. त्यांनी चित्रफिती बघीतल्या. मुख्यमंत्री जैन हिल्सच्या कार्यक्रमाला ३ वाजून २० मिनिटांनी पोहोचले. (प्रतिनिधी)उशीर झाल्याबद्दल दिलगिरी... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उशीर झाल्याबद्दल आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच कार्यक्रमाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे तसेच उपस्थितांकडे दिलगिरी व्यक्त केली. जळगावात येण्यास उशीर झाला. त्यातच महाआरोग्य शिबिराची भव्यता पाहून त्यात हरवून गेलो. मात्र त्यामुळे जैन हिल्सचा कार्यक्रम सुरू होऊ नये याची खबरदारीही आरोग्य शिबिराचे आयोजक जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतली होती. कारण या कार्यक्रमासाठीच्या निवेदिका मंगला खाडिलकर यांनाच शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमालाही बोलविले होते, असे सांगताच हशा पसरला.