शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

पवार व माझा मार्ग वेगळा पण ध्येय एकच - मोदी

By admin | Updated: February 14, 2015 14:13 IST

शरद पवार आणि मी वेगवेगळी विचारधारा असलेल्या पक्षात असलो तरी देशाचा विकास हेच आमचे ध्येय आहे असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामतीमध्ये केले आहे.

 ऑनलाइन लोकमत 

बारामती, दि. १४ - शरद पवार आणि मी वेगवेगळी विचारधारा असलेल्या पक्षात असलो तरी देशाचा विकास हेच आमचे ध्येय आहे असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामतीमध्ये केले आहे. शरद पवार आणि माझ्यात महिन्यातून दोन ते तीन वेळा चर्चा होत असते असे मोदींनी उघड केले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामती दौ-यावर आले आहेत. शरद पवारांच्या कृषी शाळेतील एका कार्यक्रमात नरेंद्र मोदी उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीत बारामतीतील सभेत शरद पवारांवर तिखट शब्दात हल्लाबोल करणा-या नरेंद्र मोदींनी आज शरद पवारांचे कौतुक केले. शरद पवार केंद्रात कृषीमंत्री असताना मी त्यांच्याकडून गुजरात कृषी विकासाविषयी माहिती घ्यायचो, आमच्या कामात काही त्रुटी आहेत हे मी त्यांच्याकडून जाणून घ्यायचो असे मोदींनी सांगितले. मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना केंद्र सरकारमध्ये माझी मदत करणारे शरद पवार हे एकमेव मंत्री होते अशी आठवणही त्यांनी याप्रसंगी सांगितली. शरद पवारांकडून खुप काही शिकण्यासारखे आहे असेही त्यांनी सांगितले. वादसंवादातूनच लोकशाही पुढे सरकते, पण दुर्दैवाने दोन विभिन्न पक्षाचे दिग्गज नेते एकत्र आले की ती बातमी ठरते असा टोलाही त्यांनी प्रसारमाध्यमांना लगावला. बारामतीत गती व मती असल्यानेच या शहराचा विकास झाला असे मोदींनी नमूद केले. साखर निर्याती आणि अॅंग्रो टेक्नोलॉजीवर भर देण्याची गरज असून ठिंबक सिंचन सारख्या पद्धतीद्वारे शेतीमध्ये पाण्याची नासाडी टाळून शेतीचा विकासही करता येईल असे मोदींनी स्पष्ट केले. तर राजकारण फक्त दोन दिवसांपुरते करायला हवे, उर्वरित ३६३ दिवस देशाच्या विकासाकडे बघायला हवे असे शरद पवार यांनी  सांगितले.