शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

पावणेदोनशे नवे न्यायाधीश

By admin | Updated: January 13, 2015 02:59 IST

राज्यातील विविध न्यायालयांत लवकरच १७९ न्यायाधीशांसह ७५१ साहाय्यभूत कर्मचाऱ्यांच्या पदांना राज्य शासनाने मान्यता दिली आहे

नारायण जाधव, ठाणेराज्यातील विविध न्यायालयांत लवकरच १७९ न्यायाधीशांसह ७५१ साहाय्यभूत कर्मचाऱ्यांच्या पदांना राज्य शासनाने मान्यता दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने कान टोचल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याने राज्यातील न्यायदान प्रक्रियेस गती मिळून सर्वसामान्यांना लवकर न्याय मिळणे सुकर होणार आहे. या सर्वांवर वर्षाला ४८ कोटी ४१ लाख ५२ हजार रुपये खर्च होणार असून त्यात वाहने, फर्निचर, पुस्तकांसह संगणकांवर खर्च होणाऱ्या १७ कोटी ७३ लाख रुपयांचा समावेश आहे़ राज्यातील विविध न्यायालयांत १,७८१ न्यायाधीशांची पदे मंजूर असून, त्यापैकी १० टक्के म्हणजेच १७९ न्यायाधीशांची पदे निर्माण करण्यास विधी व न्याय विभागाने नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात मंजुरी दिल्याने त्यांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे़सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्यात दिलेल्या निर्देशानुसार राज्य शासनाने या पदांना मान्यता दिली आहे़ यात ३२ जिल्हा न्यायाधीश, ३५ दिवाणी न्यायाधीश तथा महानगर दंडाधिकारी, ११२ कनिष्ठ न्यायाधीश तसेच लघुलेखक, वरिष्ठ व कनिष्ठ लिपिकांसह शिपाई अशी ७५१ साहाय्यभूत पदे असतील.