शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

पाचगाव देशातील पहिले वायफाय खेडे

By admin | Updated: July 6, 2015 02:15 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाच्या घोषणेनंतर उमरेड तालुक्यातील पाचगाव येथे मोफत ‘वायफाय’ सुरू करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केली.

उमरेड (जि़ नागपूर) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाच्या घोषणेनंतर उमरेड तालुक्यातील पाचगाव येथे मोफत ‘वायफाय’ सुरू करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केली. त्यानुसार पाचगाव हे देशातील पहिले ‘वायफाय’ गाव ठरले आहे. संसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत २५ कोटी रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजनही या वेळी करण्यात आले़या वेळी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, खासदार कृपाल तुमाने आदी उपस्थित होते. गडकरी म्हणाले, महाराष्ट्रात १०० टक्के ग्रामपंचायती वायफाय यंत्रणेशी जोडण्यात येणार असून, देशभरातील अन्य राज्यांत ४० टक्के ग्रामपंचायतींमध्ये ही सेवा पुरविण्यात येणार आहे. सदर महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम युद्धस्तरावर सुरू झाले असून, डिसेंबर २०१५पर्यंत या टेक्नॉलॉजीचा लाभ नागरिकांना मिळणार असल्याची घोषणाही या वेळी करण्यात आली. संसद आदर्श ग्राम या योजनेंतर्गत ‘विकास आराखडा’ही तयार करण्यात आला असून, केंद्र शासनाकडे सदर प्रस्ताव पाठविल्याचे ते म्हणाले़ बेरोजगारीच्या विळख्यातून मुक्त झालेला युवावर्ग, व्यसनमुक्त समाज, कर्जमुक्त शेतकरी असे स्वप्न मी या गावाचे बघत आहे. जोपर्यंत आपण आदर्श होणार नाही, तोपर्यंत गावही आदर्शाच्या पंक्तीत बसणार नाही. माझेही गाव असेच झाले पाहिजे, असे अन्य गावांसमोर आदर्शव्रत हे गाव उभारायचे आहे. या गावाचा सर्वांगीण विकास करण्यास मी कटिबद्ध असल्याचे वचनही या वेळी गडकरी यांनी दिले. कार्यक्रमात तावडे, लोणीकर आदी मान्यवरांचीही भाषणे झाली़ (प्रतिनिधी)> गडकरी म्हणाले, देशभरातील अन्य राज्यांत ४० टक्के ग्रामपंचायतींमध्ये ही सेवा पुरविण्यात येणार आहे. डिसेंबर २०१५पर्यंत या टेक्नॉलॉजीचा लाभ नागरिकांना मिळणार असल्याची घोषणाही या वेळी करण्यात आली.