शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

घरात ‘नागपंचमी’ गावात ‘पत्तेपंचमी’

By admin | Updated: August 6, 2016 16:55 IST

नागपंचमी या सणाची ग्रामीण भागात मोठी आतुरता असते. या दिवशी बहुतांश गावात पत्ते खेळण्याची परंपरा आहे.

धनंजय कपाले
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. ६ -  नागपंचमी या सणाची ग्रामीण भागात मोठी आतुरता असते. या दिवशी बहुतांश गावात पत्ते खेळण्याची परंपरा असुन यात तरूणांसह वृध्दांचाही समावेश असतो. मात्र, या परंपरेला वेगळे वळण लागत असून नागपंचमीचा सण संपल्यानंतरही अनेक गावांत पत्त्याचे डाव रंगतात. 
पवित्र श्रावणाचा महिना म्हणजे सणांची मांदियाळीच, नागपूजेसाठी प्रसिद्ध असलेल्या नागपंचमी या सणाला अनन्य साधारण महत्त्व असले तरी काही कुप्रथाही अनेक वर्षांपासून रूढ झाल्या आहेत. आषाढ महिन्यातील दीप अमावस्येला ‘गटारी अमावस्या’ साजरी केल्यानंतर गावागावातील जुगारी नागपंचमीच्या दिवशी ‘पत्ते पंचमी’ साजरी करीत दिवस-रात्र पत्त्यांच्या डावात लाखो रुपयांची उलाढाल करून कुणी कंगाल तर कुणी मालामाल होतात.
जुगा-यांना पर्वणी ठरलेल्या पत्ते पंचमीला वाशिम शहरासह प्रत्येक  तालुक्यात गावात पत्त्यांचे मोठे डाव भरविले जातात. जिल्ह्यातील अनेक गावामध्ये तर या डावाला अक्षरश: जत्रेचे स्वरूप येते. यात एक्का-बादशाह, तिर्रट असे पत्त्यांचे खेळामध्ये पैसे लावून हजारो रुपयांचा जुगार खेळला जातो.
ग्रामीण भागात दिवस उगवल्यापासूनच सर्रासपणे कोणाचीही भीती न बाळगता पत्त्यांचे डाव सुरू होते. शहरासह ग्रामीण भागात या दिवशी खेळल्या जाणाºया जुगाराकडे पोलिसांचाही काना डोळा असतो. नागपंचमीच्या दिवशी सुरू असलेल्या या पत्ते पंचमीच्या खेळात जास्तीत जास्त तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येतो. दिवस आणि रात्रभर खेळल्या जाणाºया या पत्त्यांच्या खेळात लाखो रुपयांची उलाढाल होते. 
गेल्या अनेक पिढ्यांपासुन घरात ‘नागपंचमी’ तर गावात सार्वजनिक ‘पत्तेपंचमी’ साजरी होताना दिसून येत आहे. पत्त्यांच्या या खेळांमुळे तरुणपिढी व्यसनाधीन होऊन नादी लागत आहे. जुगाराच्या या खेळात अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. ही प्रथा बंद करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.
गत दोन ते तीन वर्षाआधी पोलीस विभागाच्यावतिने या दिवशी विशेष मोहीम राबविण्यात आली होती.