शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

पोतराज प्रथेला मूठमाती!

By admin | Updated: April 17, 2015 01:31 IST

परंपरा आणि कुटुंबाच्या हट्टामुळे १६ वर्षीय युवकाचा ‘पोतराज’ बनविण्याचा विधी झाला. पण समाजात मिळणाऱ्या हीन वागणुकीमुळे तो अस्वस्थ झाला अन् या परंपरेच्या जोखडातून मुक्त होण्याचा निर्धार त्याने केला़

महेश कोटीवाले - सोलापूरपरंपरा आणि कुटुंबाच्या हट्टामुळे १६ वर्षीय युवकाचा ‘पोतराज’ बनविण्याचा विधी झाला. पण समाजात मिळणाऱ्या हीन वागणुकीमुळे तो अस्वस्थ झाला अन् या परंपरेच्या जोखडातून मुक्त होण्याचा निर्धार त्याने केला़ त्याची ही व्यथा काही सामाजिक कार्यकर्त्यांना कळली़ त्यांनी त्याच्या कुटुंबीयांना मार्गदर्शन केले आणि त्याचा मार्ग सुकर झाला़ डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनाचा मुहूर्त साधून तब्बल १८ वर्षांनंतर त्याने जटा निर्मूलन करीत दीपक अंकुश दावणे या युवकाने पोतराज परंपरेला मूठमाती दिली. दहावीला ६७ टक्के एवढे गुण घेऊन उत्तीर्ण झाला होता़ वयाच्या १६व्या वर्षी झालेल्या पोतराज विधीमुळे शिक्षणाचा काहीच उपयोग होणार नाही आणि आपल्याला समाजात ‘पोतराज’ म्हणून वावरावे लागणार असल्याच्या विचाराने दीपक अस्वस्थ झाला. ही व्यथा काही सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचली़ आरपीआय मोहोळ तालुका उपाध्यक्ष पांडुरंग दावणे, बहुजन शिक्षक-शिक्षकेतर (प्राथमिक विभाग) संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधीर कांबळे, अनिल चंदनशिवे आदींनी दीपकच्या कुटुंबाचे मतपरिवर्तन केले. डॉ़ आंबेडकर यांच्या जयंती दिनाचे मुहूर्त साधून आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या हस्ते दीपकचे जटा निर्मूलन करण्यात आले़ १८ वर्षे १४ दिवस केसाचे संगोपन केले, आज मी अंधश्रद्धेच्या जोखडातून मुक्त झालो, अशी भावना दीपकने व्यक्त केली़ हीन वागणुकीमुळे निर्णयदीपकचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू आहे. अभ्यासात हुशार. सर्व प्रकारची वाहनेही त्याला चालविता येतात़ दीपकने सामाजिक कार्यात सहभाग घेत आंदोलनही केले़; मात्र पोलिसांनी त्याला हीन प्रकारची वागणूक दिली होती़ या वागणुकीने व्यथित होऊन या प्रथेतून बाहेर पडायचेच, असा निर्धार दीपकने केला आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने तो पूर्णही केला़ विधीसाठी काढले ऋण२०१३ मध्ये १६ व्या वर्षी दीपकचा पट बसविण्याचा (पोतराज बनविण्याचा) विधी करण्यात आला. कुटुंबाला या विधीसाठी ४० हजार रुपये खर्च करावे लागले तेही ऋण काढूऩ