शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

रुग्ण सुखाय...

By admin | Updated: August 29, 2015 02:09 IST

सरकारी हॉस्पिटलमधून कायम जाणवणारी घाण, अस्वच्छता आणि कमालीचा नकारार्थी सूर बदलून दाखवत जे. जे. हॉस्पिटलच्या रेडिओलॉजी विभागाने गेल्या दोन वर्षांत केलेली क्रांती केवळ

- अतुल कुलकर्णी,  मुंबई सरकारी हॉस्पिटलमधून कायम जाणवणारी घाण, अस्वच्छता आणि कमालीचा नकारार्थी सूर बदलून दाखवत जे. जे. हॉस्पिटलच्या रेडिओलॉजी विभागाने गेल्या दोन वर्षांत केलेली क्रांती केवळ डोळे दिपवून टाकणारी आहे असे नाही, तर लाखो रुग्णांच्या आयुष्यात या विभागाने नव्याने जगण्याची आशादेखील निर्माण केली आहे. राज्यातले सगळ्यात अत्याधुनिक थ्री टेसला एमआरआय हे मशिन केवळ जे़जे़मध्ये आहे, याची कोणतीही फुशारकी न करता या विभागाने वर्षभरातच १० हजार रुग्णांच्या तपासण्या पूर्ण केल्या आहेत. जे.जे.मध्ये आधुनिकीकरणाचे वारे आणले अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी. रेडिओलॉजी विभागात आता एखाद्या पंचतारांकित खाजगी हॉस्पिटलमध्ये गेल्याची सुखद जाणीव पावलोपावली होते. शिवाय कोणत्याही सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये नाही अशी पॅक्स सिस्टीम येथे कार्यान्वित केली गेली, ज्यामुळे एमआरआय, सीटी स्कॅन, सोनोग्राफी आणि एक्सरे या सर्व तपासण्यांचे रिपोर्ट कोणत्याही डॉक्टरांना त्यांच्या कॉम्प्युटरवर केवळ रुग्ण क्रमांकावरून पाहून निदान करता येते. त्यासाठी रुग्णांना भल्या मोठ्या रिपोर्टची फाइल आणि भेंडोळी घेऊन फिरत बसावे लागत नाही. विशेष म्हणजे हे सगळे रिपोर्ट्स एक वर्षे रेडिओलॉजी विभागातल्या संगणकांवर आणि त्यानंतरची पाच वर्षे हॉस्पिटल मॅनेजमेंट सिस्टीमवर सांभाळून ठेवले जातात. रुग्णाला फक्त आपला नंबर सहा वर्षे लक्षात ठेवावा लागतो. व्हेरिकोज व्हेन लेजर थेरपी (रक्तवाहिनीचा आजार) देखील येथे होऊ लागली आहे. ज्यासाठी बाहेर किमान लाखभर रुपये मोजावे लागत होते अशी ही थेरपी येथे फक्त २५ हजारांच्या आत होत आहे. खऱ्या अर्थाने जे़जे़च्या रेडिओलॉजी विभागाने टाकलेली कात लाखो रुग्णांना दिलासा देणारी ठरली आहे. डॉ. लहाने यांच्यासह या विभागाच्या प्रमुख डॉ. मीनाक्षी गजभिये तसेच डॉ. शिल्पा दोमकोंडवार यांनी यासाठी केलेले काम सरकारी डॉक्टरांच्या तथाकथित प्रतिमेला बदलून टाकणारे ठरले आहे.‘जेजे’त रेडिओलॉजीत एका वर्षात होणाऱ्या तपासण्याप्रकारसंख्याएक्सरे १,८०,०००सोनोग्राफी१,००,०००एमआरआय १५,०००सीटी स्कॅन ५५,०००दरातला मोठा फरक (रुपये)प्रकार‘जेजे’मध्येखाजगी (किमान)एमआरआय२,००० ते २,५०० १०,०००सीटी स्कॅन१५५ ते २,००० १५,०००एक्स रे७५ २५० सोनोग्राफी१०० १५००व्हेरिकोज व्हेन थेरपी२५,०००८०,०००मेंदूतल्या रक्तवाहिन्यांमधील ब्लॉक काढण्यापासून ते मेंदूतल्या वेड्यावाकड्या झालेल्या रक्तवाहिन्या नीट करण्यापर्यंतचे उपचार येथे होताहेत, ज्याचा फायदा राज्यभरातील रुग्णांना होत आहे. सगळ्या तपासण्या नाममात्र दरात करून देत आहोत. -डॉ. तात्याराव लहाने, अधिष्ठाता

कॉम्प्युटरच्या एका बटणावर रुग्णांचे सगळे रिपोर्ट्स आम्ही विभागात कोठेही बसून तपासू शकतो. यासाठी गेली दोन-तीन वर्षे सतत केलेली मेहनत फळाला आली.-डॉ. शिल्पा दोमकोंडवार, सहा. प्रोफेसर