शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

पॅथॉलॉजी लॅबमालकांना अटक

By admin | Updated: June 29, 2016 01:59 IST

निलंबित झालेल्या डॉक्टरच्या नावाने अहवाल देणाऱ्या नवी मुंबईच्या दोन पॅथॉलॉजी लॅबच्या चालकांना पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबई : अप्रशिक्षित व्यक्तीकडून रक्त, मूत्र तपासणी करून घेतल्यामुळे निलंबित झालेल्या डॉक्टरच्या नावाने अहवाल देणाऱ्या नवी मुंबईच्या दोन पॅथॉलॉजी लॅबच्या चालकांना पोलिसांनी अटक केली आहे. रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या पॅथॉलॉजी लॅबविरुद्ध महाराष्ट्र असोसिएशन आॅफ पॅ्रक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अ‍ॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्टने गुन्हा दाखल केला होता. घणसोली येथील संकल्प लॅबोरेटरीचे मालक सागर माळी, मेघा माळी आणि कोपरखैरणेच्या सेक्टर ५ येथील आयुष लॅबच्या संतोष खांबळकर यांना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या दोन्ही लॅबमधून मिळणाऱ्या अहवालांमध्ये डॉ. एस. एन. त्रिपाठी या डॉक्टरच्या सह्या होत्या. प्रत्यक्षात या डॉक्टरला निलंबित करण्यात आलेले आहे. त्यामुळे या डॉक्टरच्या सह्या अहवालावर येऊ शकत नाहीत. या दोन लॅबव्यतिरिक्त नवी मुंबई, मुंबई आणि ठाणे परिसरातील लॅबमध्ये या डॉक्टरच्या सह्या असलेले अहवाल मिळत असल्याचे असोसिएशनकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणावरून मुंबईत सुरू असलेला बोगस पॅथॉलॉजीचा धंदा तेजीत असल्याचे उघड झाले आहे. प्रशिक्षित नसणारी व्यक्ती रक्त, मूत्र, बॉडी फ्लुइडची तपासणी करून आजारांचे निदान करत आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संदीप यादव यांनी दिली. या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी मदत केली असून, डॉ. त्रिपाठींवरही कारवाई होणार असल्याचे डॉ. यादव यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)