शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

पथारी सर्वेक्षणाचा पुणो पॅटर्न राज्यभर

By admin | Updated: July 1, 2014 00:06 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, राज्यातील महापालिकांमध्ये राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

पुणो : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, राज्यातील महापालिकांमध्ये राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यातील सर्व महापालिकांमध्ये फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीत पुणो महापालिकेने आघाडी घेतली आहे.   फेरीवाल्यांच्या जागेवर जाऊन सर्वेक्षण करण्यासह बायोमेट्रिक नोंदणी करण्याचा उपक्रम;  फेरीवाला  सर्वेक्षण आणि नोंदणीत मागे पडलेल्या पालिकांनी पुणो महापालिकेने राबविलेल्या पॅटर्ननुसार राबवावा, अशा सूचना नगरविकास विभागाचे प्रधान सचिव श्रीकांतसिंह यांनी  आज केल्या. 
न्यायालयाचा आदेश, तसेच केंद्र सरकारच्या कायद्यानुसार, राज्यभरातील महापालिकांच्या मार्फत राबविण्यात येत असलेल्या  फेरीवाला धोरणाचा आढावा घेण्यासाठी राज्यातील महापालिकांची बैठक आज नगरविकास विभागाचे प्रधान सचिव श्रीकांतसिंह यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झाली.  मुंबई, नवी मुंबई, पुणो, ठाणो, नागपूर, नाशिक यांसह इतर प्रमुख महापालिकांचे अधिकारी उपस्थित होते. प्रत्येक पालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या फेरीवाला धोरणाची माहिती या वेळी घेण्यात आली. केंद्र सरकारच्या फेरीवाला कायद्यातील तरतुदींवर आधारित फेरीवाल्यांसाठी राज्य सरकारतर्फे स्वतंत्र धोरण बनविण्यात येणार आहे. त्यासाठी, उच्चस्तरीय समिती नियुक्त केली जाणार असल्याचे बैठकीत जाहीर करण्यात आले.
फेरीवाला सर्वेक्षणाचे काम काही महापालिकांमध्ये अद्याप सुरूही झाले नसल्याने त्यांनी ते वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा, अशा सूचना  या महापालिका आयुक्तांना देण्यात आल्या. तसेच, त्यासाठी पुणो पॅटर्न राबविण्याच्या सूचना देण्यात 
आल्या.  (प्रतिनिधी)
 
4या बैठकीत पुणो महापालिकेने राबविलेल्या विशेष उपक्रमांचे सादरीकरणही करण्यात आले. त्यासाठी पालिकेच्या अधिका:यांना राज्य शासनाकडून विशेष आमंत्रित करण्यात आले होते. त्यानुसर, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी हे सादरीकरण केले.