शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

पथदिव्यांचे ढिसाळ नियोजन

By admin | Updated: April 26, 2016 02:42 IST

महापालिकेच्या गलथानपणामुळे पथदिव्यांची देखभाल आणि विद्युत देयकांपोटी कोट्यवधी रुपये खर्ची घातले जात आहेत.

कमलाकर कांबळे,

नवी मुंबई- महापालिकेच्या गलथानपणामुळे पथदिव्यांची देखभाल आणि विद्युत देयकांपोटी कोट्यवधी रुपये खर्ची घातले जात आहेत. या प्रकाराकडे महापालिकेच्या संबंधित विभागाने सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केल्याने वीज बचतीच्या धोरणाला हरताळ फासला गेल्याचे दिसून आले आहे.महापालिका कार्यक्षेत्रात एकूण ४0 हजार ९५८ पथदिवे आहेत. हे पथदिवे चालू आणि बंद करण्यासाठी यांत्रिकी पध्दतीचा अवलंब करण्यात येतो. यात पथदिवे चालू करण्याची व बंद करण्याची वेळ नमूद करण्यात आलेली असते. त्यामुळे सायंकाळच्या वेळी ठरलेल्या वेळेत हे पथदिवे आपोआप चालू होतात, तर सकाळच्या वेळी नमूद वेळेत बंद होतात. असे असले तरी अनेक विभागाचे वेळेचे हे गणित विस्कळीत झाल्याचे दिसून आले आहे. याचा परिणाम म्हणून काही ठिकाणी सूर्यास्ताअगोदरच दिवे लागतात. काही भागात सूर्योदयानंतरही दिवे चालू असल्याचे पाहावयास मिळते. या प्रकारामुळे विजेचा अतिरिक्त वापर होत आहे. विशेष म्हणजे त्यामुळे वीज बिलातही वाढ होत आहे.महापालिका शहरातील पथदिव्यांची देखभाल व वीज बिलापोटी वर्षाला २५ कोटी ६५ लाख रुपये खर्च करते. यात केवळ विद्युत बिलावर १७ कोटी ४0 लाख ८८ हजार रुपये खर्च होतात. याचाच अर्थ महिन्याला साधारण दीड कोटी रुपये खर्च केले जात असल्याची बाब माहितीच्या आधिकारातून उघड झाली आहे. वास्तविकपणे हा खर्च अवास्तव असून केवळ संबंधित विभागाच्या गलथानपणामुळे प्रशासनाला अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागत असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते सुधीर दाणी यांनी केला आहे.पथदिव्यांच्या देखभालीसाठी वर्षाला आठ कोटी २४ लाख ४९ हजार रुपये खर्च केले जातात. विशेष म्हणजे शहराच्या अनेक भागातील विद्युत दिवे बंद अवस्थेत आहेत. झोपडपट्टी परिसरातील विद्युत खांबांचीच दुरवस्था झाली आहे.